IPL 2026 Points Table: टायटन्सची चालली जादू! कोलकात्याला हरवून गुजरातनं गुणतालिकेत केला उलटफेर; हैदराबाद आणि दिल्लीला फटका

Gujarat Titans Jump to 4th Place: आयपीएल 2026 च्या रोमांचक प्रवासात 17 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट राइडर्सचा 5 गडी राखून पराभव केला.
Gujarat Titans Jump to 4th Place
Gujarat Titans Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2026 Points Table Standings: आयपीएल 2026 च्या रोमांचक प्रवासात 17 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट राइडर्सचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच गुजरातने चालू हंगामातील आपला तिसरा विजय नोंदवला असून गुणतालिकेत महत्त्वाची आघाडी घेतली. या विजयापूर्वी गुजरातचा संघ सहाव्या क्रमांकावर होता, परंतु कोलकाताला धूळ चारल्यानंतर त्यांनी थेट चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. गुजरातच्या या कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांसारख्या संघांना फटका बसला असून ते आता गुणतालिकेत खाली घसरले.

सध्याच्या गुणतालिकेवर नजर टाकली तर पंजाब किंग्सचा दबदबा पाहायला मिळत आहे. पंजाबचा संघ 9 गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्यांच्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 8 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान रॉयल्सचेही 8 गुण असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. कोलकाता विरुद्धच्या विजयानंतर गुजरात टायटन्सने 6 गुणांची कमाई करत चौथे स्थान पटकावले. दुसरीकडे, पराभवाचा सामना करावा लागलेला कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अवघ्या 1 गुणासह गुणतालिकेत सर्वात तळाला म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे.

Gujarat Titans Jump to 4th Place
कमबॅक होताच चेन्नईला मोठा धक्का, ऐन वेळी 'या' स्टार खेळाडूची IPL 2026 मधून एक्झिट, कोणाला मिळणार संधी?

इतर संघांच्या स्थितीचा विचार केल्यास, सनरायझर्स हैदराबाद 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचेही 4 गुण असून ते सहाव्या क्रमांकावर आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स प्रत्येकी 4 गुणांसह अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. पाच वेळा विजेतेपद भूषवणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ या हंगामात संघर्ष करताना दिसत असून, 2 गुणांसह ते नवव्या स्थानावर आहे. गुजरातच्या या विजयामुळे आता प्ले-ऑफची शर्यत अधिक रंजक झाली असून आगामी सामन्यांमध्ये गुणतालिकेत आणखी मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com