Gujrat Team  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026 Points Table: गुणतालिकेत हायव्होल्टेज ड्रामा! गुजरात-केकेआरचा दणदणीत विजय; 4 संघ 12 गुणांवर, पंजाबचं अव्वल स्थान धोक्यात

IPL Playoff Scenarios 12 Points Teams: आयपीएल 2026 चा हंगाम आता अत्यंत अटीतटीच्या वळणावर आला असून रविवारी झालेल्या दोन महत्त्वपूर्ण लढतींनंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.

Manish Jadhav

IPL 2026 Points Table: आयपीएल 2026 चा हंगाम आता अत्यंत अटीतटीच्या वळणावर आला असून रविवारी झालेल्या दोन महत्त्वपूर्ण लढतींनंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 7 गडी राखून पराभव केला. तर, दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) पंजाब किंग्सवर 4 गडी राखून मात केली. या निकालांमुळे प्लेऑफची शर्यत कमालीची मनोरंजक झाली असून कोणता संघ अंतिम चारमध्ये स्थान मिळवेल, हे सांगणे आता कठीण झाले.

गुणतालिकेतील सध्याच्या स्थितीचा विचार केल्यास, गुजरात टायटन्सकडून पराभूत होऊनही पंजाब किंग्स 13 गुणांसह अद्याप पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मात्र, पंजाब आणि इतर संघांमधील गुणांचे अंतर आता खूपच कमी झाले. पंजाब पाठोपाठ आरसीबी (RCB), सनरायझर्स हैदराबाद (SRH), राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) या चारही संघांच्या खात्यात प्रत्येकी 12 गुण जमा झाले. यामुळे यापैकी कोणताही संघ पुढील एका विजयासह पंजाबला मागे टाकून अव्वल स्थानी झेप घेऊ शकतो. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) 8 गुणांसह शर्यतीत मागे आहेत, तर केकेआर 7 गुणांवर पोहोचला. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) प्रत्येकी 4 गुणांसह तळाला आहेत.

दरम्यान, आज (4 मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात 'करो या मरो'ची लढत रंगणार आहे. मुंबईचा हा 10 वा तर लखनौचा 9वा सामना असेल. जो संघ हा सामना जिंकेल, त्यांच्या खात्यात 6 गुण होतील. मात्र, विजयानंतरही हा संघ गुणतालिकेत 9व्या किंवा 10व्या स्थानावरच राहील. मुंबईसाठी हा सामना अत्यंत निर्णायक आहे; जर आज मुंबईचा संघ हरला, तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. लखनौने विजय मिळवला तर त्यांच्या प्लेऑफच्या आशा तांत्रिकदृष्ट्या जिवंत राहतील. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT