IPL 2026 Playoffs Schedule Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026 Playoffs Schedule: आयपीएलच्या प्लेऑफचा बिगुल वाजला! धरमशाला आणि चंदीगडमध्ये सेमीफायनल तर जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार फायनलचा थरार

IPL 2026 Final Narendra Modi Stadium: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या प्लेऑफ फेरीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले.

Manish Jadhav

IPL 2026 Playoffs Schedule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या प्लेऑफ फेरीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. लीग स्टेजमधील 70 अटीतटीच्या सामन्यांनंतर आता हा थरार त्याच्या निर्णायक टप्प्यात पोहोचला. विशेष म्हणजे, या हंगामात काही तांत्रिक आणि लॉजिस्टिक कारणांमुळे प्लेऑफचे सामने तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.

वेळापत्रकानुसार, गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमधील 'क्वॉलिफायर 1' चा सामना 26 मे रोजी धरमशाला येथील नयनरम्य एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्यानंतर, 27 मे रोजी न्यू चंदीगड येथील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये 'एलिमिनेटर'चा सामना होईल. याच मैदानावर 29 मे रोजी 'क्वॉलिफायर 2' चा सामना पार पडेल, ज्यामध्ये क्वॉलिफायर 1 मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरमधील विजेता संघ अंतिम फेरीतील दुसऱ्या जागेसाठी एकमेकांशी भिडतील.

या भव्य हंगामाचा समारोप 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल 2026 चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अंतिम सामन्याचे यजमानपद बंगळुरुकडे सोपवण्यात आले होते. मात्र, स्थानिक असोसिएशन आणि प्राधिकरणांच्या काही अटी बीसीसीआयच्या (BCCI) मार्गदर्शक तत्त्वांच्या पलीकडे असल्याने बीसीसीआयने बंगळुरुकडून यजमानपद काढून घेत ते अहमदाबादला बहाल केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT