IPL Impact Player Rule Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026: आयपीएलमध्ये 'इम्पॅक्ट' खेळाडू नकोसाच, स्पर्धेतील सहभागी संघ कर्णधारांच्या बैठकीतील सूर; नियम 2027 पर्यंत कायम

IPL Impact Player Rule 2027: आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट’ खेळाडूच्या नियमाचे समर्थन करणाऱ्यांपेक्षा विरोध करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मुंबई: आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट’ खेळाडूच्या नियमाचे समर्थन करणाऱ्यांपेक्षा विरोध करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आता आयपीएलमध्ये सहभागी होत असलेल्या दहा संघांच्या कर्णधारांची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत ‘इम्पॅक्ट’ खेळाडूचा नियम नकोसाच असल्याचा सूर उमटला आहे; मात्र बीसीसीआयकडून हा नियम २०२७पर्यंत कायम ठेवण्यात आल्यामुळे कर्णधारांनी नाराजी व्यक्त केली.

आयपीएल सूत्रांकडून या वेळी सांगण्यात आले, की आयपीएलमधील सहभागी बहुतांशी कर्णधारांकडून ‘इम्पॅक्ट’ खेळाडूच्या नियमाबाबत नाराजी व्यक्त केली आहे; मात्र बीसीसीआयकडून हा नियम २०२७पर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कर्णधारांना सांगण्यात आले आहे, की या नियमाचे पुनरावलोकन २०२७नंतर करण्यात येईल.

याआधी दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार अक्षर पटेल याने ‘इम्पॅक्ट’ खेळाडूच्या नियमाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्याने पत्रकार परिषदेत याबाबत मत व्यक्त करताना म्हटले, की संघामध्ये अष्टपैलू खेळाडूला याआधी प्राधान्य देण्यात येत होते; पण आता संघ व्यवस्थापनाला अष्टपैलू खेळाडूची गरजच वाटत नाही. मी स्वत: एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे ‘इम्पॅक्ट’ खेळाडूचा नियम मला पसंत नाही.

रोहित शर्मा याने २०२४मध्ये ‘इम्पॅक्ट’ खेळाडूबाबत आपले मत परखड शब्दांत व्यक्त करताना म्हटले, की मी ‘इम्पॅक्ट’ खेळाडू या नियमाचा चाहता नाही. या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूच्या विकासामध्ये बाधा येत आहे. याशिवाय हार्दिक पंड्या व ग्लेन फिलिप्स या खेळाडूंकडूनही ‘इम्पॅक्ट’ खेळाडूच्या नियमाबाबत निराशा व्यक्त करण्यात आली होती.

सर्व कर्णधारांनी २०२६च्या हंगामासाठी जारी केलेल्या सरावाच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल आयपीएल अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. फ्रँचायझींना दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सामन्याच्या दिवशी सरावाला परवानगी दिली जाणार नाही आणि जर एका संघाने आपला सराव लवकर संपवला, तर दुसऱ्या संघाला सरावासाठी खेळपट्ट्या वापरण्याची परवानगी नाही. कर्णधारांना सरावाच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल अधिक स्पष्टता हवी होती आणि ती त्यांना देण्यात आली, असेही सूत्राने सांगितले.

पहिल्या डावातही चेंडू बदलण्याची मागणी

बीसीसीआयकडून मागील मोसमात दुसऱ्या डावातील दहा षटकांनंतर चेंडू बदलण्यात येण्यासाठी मुभा देण्यात आली. मुंबईत पार पडलेल्या बैठकीत एका कर्णधाराने पहिल्या डावातील दहा षटके पूर्ण झाल्यानंतर चेंडू बदलण्याची मागणी केली. सूत्रांकडून याबाबत सांगण्यात आले, की पहिल्या डावातील दहा षटकांनंतर चेंडू बदलण्यात येण्याची मागणी करण्यात आली; पण या मागणीला अधिक प्रतिसाद मिळाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

Goa Water Metro Project: 'प्रकल्प नेमका कुणासाठी?' वॉटर मेट्रोच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT