Harry Brook | Travis Head X
क्रीडा

IPL 2024 Auction: ट्रेविस हेड 'या' संघात सामील, तर ब्रुकला तब्बल 9.25 कोटींचा तोटा

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 लिलावात ट्रेविस हेडला 6 कोटींहून अधिक रकमेची बोली लागली आहे.

Pranali Kodre

IPL 2024 Players Auction, Travis Head and Harry Brook

इंडियन प्रीमीयर लीग 2024 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 डिसेंबर) लिलाव होत आहे. हा लिलाव दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये होत आहे. या लिलावात पहिल्यांदाच परदेशी फलंदाजांवर बोली लागताना दिसली.

पहिल्यांदा वेस्ट इंडिजचा रोवमन पॉवेलला राजस्थान रॉयल्सने 7. 40 कोटी रुपयांना त्याला खरेदी केले आहे. त्यानंतर गेल्यावर्षी चर्चेत आलेल्या हॅरी ब्रुकचे नाव लिलावात आले. हॅरी ब्रुकला दिल्ली कॅपिटल्सने 4 कोटी रुपयांना खरेदी केले.

विशेष म्हणजे ब्रुकला गेल्यावर्षी लिलावात सनरायझर्स हैदराबादने तब्बल 13.35 कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र, त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. त्याला 11 सामन्यात 190 धावाच करता आल्या होत्या.

त्यानंतर ब्रुकला हैदराबादने आयपीएल 2024 लिलावापूर्वी करारमुक्त केले. अखेर या लिलावात ब्रुकला दिल्लीने संघात घेतले. मात्र, यंदा त्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 9.25 कोटी रुपये कमी मिळाले.

हेड झाला हैदराबादचा सदस्य

दरम्यान, ट्रेविस हेडला सनरायझर्स हैदराबाजने आयपीएल 2024 लिलावात 6.80 कोटी रुपयात खरेदी केले. हेडचे नाव लिलावापूर्वी बरेच चर्चेत होते.

त्याने नुकतेच भारतात पार पडलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कारही पटकावला होता. त्याने अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावले होते. तसेच त्याच्याकडे फिरकी गोलंदाजी करण्याचीही क्षमता आहे. तसेच तो चांगल्या फॉर्ममध्येही आहे. त्यामुळे त्याला मोठी किंमत मिळेल, अशी अपेक्षा होती.

त्यानुसार लिलावात त्याला खरेदी करण्यासाठी हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स संघात चुरस दिसली, पण अखेर ही शर्यत हैदराबादने जिंकली.

दरम्यान, या लिलावात पहिल्या सेटमध्ये मनीष पांडे, करूण नायर आणि स्टीव्ह स्मिथ या मोठ्या नावांना बोली लागली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT