Mitchell Starc | Gerald Coetzee X
क्रीडा

IPL Auction: KKR ने स्टार्कसाठी मोजले 24 कोटी, तर MI ला 5 कोटीत कोएत्झीची लॉटरी, पाहा प्रत्येक संघाचे महागडे खेळाडू

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 लिलावातील प्रत्येक संघातील महागड्या खेळाडूंची यादी

Pranali Kodre

IPL 2024 Players Auction, Most Expensive buy for Every Team:

इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामसाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये पार पडला. या लिलावात अनेक स्टार आणि अनुभवी खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला, तर अनेक स्टार खेळाडूंना खरेदीदार मिळालाच नाही.

या लिलावात सर्वच 10 फ्रँचायझी व्यस्त दिसल्या, तसेच प्रत्येक फ्रँचायझीनेच कोटींमध्ये लिलावात पैसा खर्च केला. कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक 10 खेळाडू या लिलावत खरेदी केले. यातील त्यांनी मिचेल स्टार्कसाठी लावलेल्या बोलीने इतिहास घडवला. त्याच्यासाठी त्यांनी तब्बल 24.75 कोटी रुपये मोजले.

याशिवाय दिल्ली कॅपिटल्सने 9 खेळाडू खरेदी केले. तसेच चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्रत्येकी 6 खेळाडू खरेदी केले. हैदराबादने खरेदी केलेल्या 6 खेळाडूंमध्ये त्यांनी एकट्या पॅट कमिन्ससाठी 20.50 कोटी रुपये खर्च केले.

दरम्यान गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या संघांनी प्रत्येकी 8 खेळाडू खरेदी केले. सर्वात कमी 5 खेळाडू राजस्थान रॉयल्सने खरेदी केले.

दरम्यान, 10 संघांनी मिळून 72 खेळाडूंना खरेदी केले, ज्यात 30 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच या 72 खेळाडूंसाठी 10 संघांनी मिळून 2,30,45,00,000 रुपये खर्च केले.

दरम्यान, प्रत्येक संघाचा आयपीएल 2024 लिलावातील सर्वात महागडा खेळाडू कोणता ठरला यावर एक नजर टाकू.

चेन्नई सुपर किंग्स -

  • 14 कोटी - डॅरिल मिचेल

कोलकाता नाईट रायडर्स

  • 24.75 कोटी - मिचेल स्टार्क

दिल्ली कॅपिटल्स

  • 7.20 कोटी - कुमार कुशाग्र

लखनऊ सुपर जायंट्स

  • 6.40 कोटी - शिवम मावी

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

  • 11.50 कोटी - अल्झारी जोसेफ

सनरायझर्स हैदराबाद

  • 20.50 कोटी - पॅट कमिन्स

गुजरात टायटन्स

  • 10 कोटी - स्पेन्सर जॉन्सन

मुंबई इंडियन्स

  • 5 कोटी - गेराल्ड कोएत्झी

पंजाब किंग्स

  • 11.75 कोटी - हर्षल पटेल

राजस्थान रॉयल्स

  • 7.40 कोटी - रोवमन पॉवेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT