IPL 2024 Auction: एकाच भारतीयावर 10 कोटीपेक्षा जास्त बोली! 'हे' आहेत टॉप-10 महागडे खेळाडू

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 लिलावातील सर्वात महागड्या 10 खेळाडूंबद्दल जाणून घ्या
IPL 2024 Auction
IPL 2024 AuctionX

Most Expensive Players in IPL 2024 Players Auction at Dubai:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) पार पडला. हा लिलाव दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये पार पडला. या लिलावासाठी 333 खेळाडू रिंगणात होते. मात्र, यातील 72 खेळाडूंनाच यशस्वी बोली लागली.

दरम्यान, हा लिलाव ऐतिहासिक ठरला. कारण आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या खेळाडूला 20 कोटींहून अधिकची बोली लागली.

या लिलावादरम्यान, स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी 24.75 कोटी रुपयांची बोली लावली. तसेच कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपये मोजत संघात घेतले. त्यामुळे हे दोघे आयपीएलमधील सर्वात महागडे खेळाडूही ठरले.

IPL 2024 Auction
IPL 2024: विक्रमी लिलाव! कोणत्या फ्रँचायझीने कोणाला केलं खरेदी, पाहा 10 टीमची यादी एका क्लिकवर

हर्षल पटेल या लिलावातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्यासाठी पंजाब किंग्सने 11.75 कोटी रुपये खर्च केले.

या लिलावात बोली लागलेल्या एकूण 72 खेळाडूंमध्ये 30 परदेशी खेळाडू आहेत. तसेच 72 खेळाडूंवर मिळून 10 संघांकडून 2,30,45,00,000 रुपये खर्च करण्यात आला.

दरम्यान या 72 खेळाडूंपैकी 39 खेळाडूंना 1 कोटीहून अधिक रक्कमेची बोली लागली. तसेच 6 खेळाडूंना 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली. या 6 खेळाडूंमध्ये केवळ हर्षल हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

IPL 2024 Auction
WI vs ENG T20I: IPL लिलावात अनसोल्ड राहिलेल्या सॉल्टचं सलग दुसरं शतक! इंग्लंडचा विंडीजला धोबीपछाड

आयपीएल 2024 लिलावातील सर्वात महागडे 10 खेळाडू

  • 24.75 कोटी - मिचेल स्टार्क (कोलकाता नाईट रायडर्स)

  • 20.50 कोटी - पॅट कमिन्स (सनरायझर्स हैदराबाद)

  • 14 कोटी - डॅरिल मिचेल (चेन्नई सुपर किंग्स)

  • 11.75 कोटी - हर्षल पटेल (पंजाब किंग्स)

  • 11.50 कोटी - अल्झारी जोसेफ (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)

  • 10 कोटी - स्पेन्सर जॉन्सन (गुजरात टायटन्स)

  • 8.40 कोटी - समीर रिझवी (चेन्नई सुपर किंग्स)

  • 8 कोटी - रिली रुसौ (पंजाब किंग्स)

  • 7.40 कोटी - शाहरुख खान (गुजरात टायटन्स)

  • 7.40 कोटी - रोवमन पॉवेल (राजस्थान रॉयल्स)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com