IPL 2023 Auction Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2024 Auction: दुबईत 333 खेळाडू रिंगणात! केव्हा अन् कसा पाहाणार लिलाव?

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 हंगामाचा लिलाव दुबईत 19 डिसेंबरला पार पडणार आहे.

Pranali Kodre

IPL 2024 Players Auction:

इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम पुढील वर्षी रंगणार आहे. त्यामुळे या हंगामाला काही महिनेच शिल्लक राहिले असल्याने सर्वच 10 फ्रँचायझींनी संघबांधणी करण्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, लिलावात जवळपास सर्वच संघ संघबांधणी बऱ्यापैकी पूर्ण करताना दिसतील.

या लिलावासाठी जवळपास हजाराहून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यातील बीसीसीआयने 333 खेळाडूंची लिलावासाठी निवड केली आहे. या 333 खेळाडूंमध्ये 214 भारतीय खेळाडू, 119 परदेशी खेळाडू आहेत.

तसेच 333 खेळाडूंपैकी 116 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे आणि 215 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही.

दरम्यान, 10 संघात मिळून केवळ 77 खेळाडूंसाठी जागा रिक्त आहे. त्यामुळे 333 खेळाडूंमधून फक्त 77 खेळाडूंवरच बोली लागण्याची शक्यता आहे. यामध्ये 30 परदेशी खेळाडूंसाठी जागा रिक्त आहे.

पहिल्यांदाच परदेशात होणार लिलाव

आयपीएल 2024 हंगामाचा लिलाव दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये रंगणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच परदेशात आयपीएलचा लिलाव होताना दिसणार आहे. यापूर्वी झालेल्या सर्व १६ हंगामाचे लिलाव भारतात झाले होते.

लिलावकर्ताही बदलणार

माध्यमांतील वृत्तानुसार आयपीएल 2024 हंगामाच्या लिलावासाठी मलिका सागर लिलावर्ता म्हणून काम पाहाणार आहेत. यापूर्वी 2008 ते 2018 दरम्यान रिचर्ड मॅडली यांनी ही जबाबदारी सांभाळली होती.

त्यानंतर 2019 ते 2023 हंगामादरम्यान ह्यू एडमीड्स लिलावकर्ता होते. तसेच 2022 हंगामाच्या लिलावामध्ये एडमीड्स यांची शुद्ध हरपल्याने चारू शर्मा यांनी उर्वरित लिलावात लिलावकर्ता म्हणून भूमिका बजावली होती.

लिलावाची वेळ

आयपीएल 2024 हंगामाचा लिलाव दुबईतील स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरु होईल, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.00 वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे.

लाईव्ह स्ट्रिमिंग

आयपीएल 2024 हंगामाचा लिलाव टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर लाईव्ह पाहाता येणार आहे. तर जिओ सिनेमा ऍप किंवा वेबसाईटवरही हा लिलाव लाईव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे.

सर्व संघांकडे शिल्लक असलेली रक्कम आणि खेळाडूंची जागा

चेन्नई सुपर किंग्स -

  • शिल्लक रक्कम - 31.4 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 6 (परदेशी खेळाडू - 3)

दिल्ली कॅपिटल्स

  • शिल्लक रक्कम - 28.95 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 9 (परदेशी खेळाडू - 4)

गुजरात टायटन्स

  • शिल्लक रक्कम - 38.15 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 8 (परदेशी खेळाडू - 2)

कोलकाता नाईट रायडर्स

  • शिल्लक रक्कम - 32.7 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 12 (परदेशी खेळाडू - 4)

लखनऊ सुपर जायंट्स

  • शिल्लक रक्कम - 13.15 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 6 (परदेशी खेळाडू - 2)

मुंबई इंडियन्स

  • शिल्लक रक्कम - 17.75 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 8 (परदेशी खेळाडू - 4)

पंजाब किंग्स

  • शिल्लक रक्कम - 29.1 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 8 (परदेशी खेळाडू - 2)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

  • शिल्लक रक्कम - 23.25 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 6 (परदेशी खेळाडू - 3)

राजस्थान रॉयल्स

  • शिल्लक रक्कम - 14.5 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 8 (परदेशी खेळाडू - 3)

सनरायझर्स हैदराबाद

  • शिल्लक रक्कम - 34 कोटी रुपये

  • शिल्लक जागा - 6 (परदेशी खेळाडू - 3)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT