IPL 2024 Auction
IPL 2024 Auction IPL
क्रीडा

IPL 2024: विक्रमी लिलाव! कोणत्या फ्रँचायझीने कोणाला केलं खरेदी, पाहा 10 टीमची यादी एका क्लिकवर

Pranali Kodre

10 Teams Squad after IPL 2024 Players Auction:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या लिलावाने इतिहास रचला आहे. या हंगामाचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये पार पडला. या लिलावात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना 20 कोटींपेक्षा जास्त किंमतीची बोली लागली.

स्टार्क आणि कमिन्स आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू ठरले. स्टार्कसाठी कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी 24.75 कोटी रुपयांची बोली लावली. तसेच कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपये मोजले.

दरम्यान, या लिलावात एकूण 72 खेळाडूंवर बोली लागली, ज्यातील 30 परदेशी खेळाडू आहेत. तसेच 72 खेळाडूंवर मिळून 2,30,45,00,000 रुपये खर्च करण्यात आला. तसेच 39 खेळाडूंना 1 कोटीहून अधिक रकमेची बोली लागली.

हर्षल पटेल या लिलावातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्यासाठी पंजाब किंग्सने 11.75 कोटी रुपये खर्च केले.

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मिचेल सँटनर, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, निशांत सिंधू, अजय मंडल, दीपक चाहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, महिष तिक्षणा, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, मथिशा पाथिराना, प्रशांत सोळंकी, शेख रशीद.

  • लिलावात घेतलेले खेळाडू - डॅरिल मिशेल (14 कोटी), रचिन रवींद्र (1.80 कोटी), शार्दूल ठाकूर (4 कोटी), समीर रिझवी (8.40 कोटी), मुस्ताफिझूर रहमान (2 कोटी), अविनाश अरवेल्ली (20 लाख).

दिल्ली कॅपिटल्स

ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, विकी ओस्तवाल, एन्रिच नॉर्किया, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, इशांत शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव , प्रवीण दुबे, अभिषेक पोरेल.

  • लिलावात घेतलेले खेळाडू - ट्रिस्टन स्टब्स् (50 लाख), हॅरी ब्रुक (4 कोटी) , रिकी भुई (20 लाख), रासिख दार (20 लाख), कुमार कुशाग्र (7.20 कोटी), झाय रिचर्डसन (5 कोटी), सुमित कुमार (1 कोटी), शाय होप (75 लाख), स्वस्तिक चिक्कारा (20 लाख)

राजस्थान रॉयल्स :

संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, कुणाल सिंग राठोड, डोनोव्हॉन फरेरा, ध्रुव जुरेल, जोस बटलर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, एडम झॅम्पा, ट्रेंट बोल्ट , संदीप शर्मा, आवेश खान.

  • लिलावात घेतलेले खेळाडू - रोव्हमन पॉवेल (7.40 कोटी), शुभम दुबे (5.80 कोटी), टॉम कोहलर-कॅडमोर (40 लाख), अबिद मुस्ताक (20 लाख), नांद्रे बर्गर (50 लाख)

पंजाब किंग्ज :

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, शिवम सिंग, अथर्व तायडे, सिकंदर रझा, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, कागिसो रबाडा, राहुल चहर , अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, विधावत कवेरप्पा.

  • लिलावात घेतलेले खेळाडू - हर्षल पटेल (11.75 कोटी), ख्रिस वोक्स (4.20 कोटी), आशुतोष शर्मा (20 लाख), विश्वनाथ प्रताप (20 लाख), शशांक सिंग (20 लाख), तनय त्यागराजन (20 लाख), प्रिन्स चौधरी (20 लाख), रिली रुसो (8 कोटी).

कोलकाता नाईट रायडर्स :

श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, सुनील नारायण, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जेसन रॉय.

  • लिलावात घेतलेले खेळाडू - मिचेल स्टार्क (24.75 कोटी), चेतन साकारिया (50 लाख), केएस भारत (50 लाख), अंगक्रिश रघुवंशी (20 लाख), रमनदीप सिंग (20 लाख), शेरफान रुदरफोर्ड (1.50 कोटी), मनीष पांडे (50 लाख), मुजीब-उल-रहमान (2 कोटी), गस अटकिन्सन (1 कोटी), शाकिब हुसेन (20 लाख).

सनरायझर्स हैदराबाद :

एडेन मार्कराम (कर्णधार), राहुल त्रिपाठी, मयंक अगरवाल, हेन्रिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग, सनवीर सिंग, अब्दुल समद, मार्को यान्सिन, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन, मयंक मार्कंडे, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद.

  • लिलावात घेतलेले खेळाडू - पॅट कमिन्स (20.50 कोटी), ट्रेव्हिस हेड (6.80 कोटी), जयदेव उनाडकट (1.60 कोटी), वनिंदूं हसरंगा (1.50 कोटी), आकाश महाराज सिंग (20 लाख), जे. सुब्रमण्यम (20 लाख)

लखनऊ सुपरजायंट्स :

केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, क्विंटन डी कॉक, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पंड्या, दीपक हुडा, कृष्णप्पा गौतम, काइल मेयर्स, आयुष बडोनी, युधवीर सिंह, मार्क वुड, रवी बिष्णोई, अमित मिश्रा, नवीन उल हक, यश ठाकूर, मोहसीन खान, मयंक यादव, देवदत्त पडिक्कल.

  • लिलावात घेतलेले खेळाडू - शिवम मावी (6.40 कोटी), अर्शिन कुलकर्णी (20 लाख), एम. सिद्धार्थ (2.40 कोटी), अ‍ॅस्टन टर्नर (1 कोटी), डेव्हिड विली (2 कोटी), अर्शद खान (20 लाख)

गुजरात टायटन्स :

शुभमन गिल (कर्णधार), केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नळकांडे, मोहम्मद शमी, आर साई किशोर, मोहित शर्मा, नूर अहमद, राशिद खान, जोशुआ लिटिल.

  • लिलावात घेतलेले खेळाडू - उमेश यादव (5.80 कोटी), अझमतुल्लाह ओमरझई (50 लाख), सुशांत मिश्रा (2.20 कोटी), मानव सुतार (20 लाख), कार्तिक त्यागी (60 लाख), स्पेन्सर जॉनसन (10 कोटी), रॉबिन मिन्झ (3.60 कोटी), शाहरुख खान (7.40 कोटी)

मुंबई इंडियन्स :

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा , ईशान किशन, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, नेहल वढेरा, शम्स मुलानी, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जसप्रीत बुमराह, जेसन बेऱ्हेंनडॉर्फ , पियुष चावला, कुमार कार्तिकेय, रोमारिओ शेफर्ड, आकाश मधवाल.

  • लिलावात घेतलेले खेळाडू - गेराल्ड कोएत्झी (5 कोटी), श्रेयस गोपाल (20 लाख), दिलशान मधुशंका (4.60 कोटी), नुवान तुषारा (4.80 कोटी), नमन धीर (20 लाख), अंशुल कंबोज (20 लाख), मोहम्मद नबी (1.50 कोटी), शिवालिक शर्मा (20 लाख)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, दिनेश कार्तिक, अनुज रावत, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, आकाश दीप, विल जॅक्स, विजयकुमार वैशाख, कर्ण शर्मा, रिस टोप्ली, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मयंक डागर, कॅमेरॉन ग्रीन.

  • लिलावात घेतलेले खेळाडू - अल्झारी जोसेफ (11.50 कोटी), यश दयाल (5 कोटी), टॉम करन (1.50 कोटी), लोकी फर्ग्युसन (2 कोटी), स्वप्नील सिंग (20 लाख), सौरव चौहान (20 लाख).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: गोवा पोलिसांचा आणखी एक प्रताप! PSI ची महिलेला बेदम मारहाण, 'बूट चाट' म्हणणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Goa Crime: जेवण देतो, असं सांगत 16 वर्षांच्या मुलीला फ्लॅटवर नेलं; 58 वर्षांच्या नराधमाने केला बलात्कार

Goa Congress: अमित पाटकरांचा गडकरींना ईमेल; कामाची यादी देत मागितली भेटीची वेळ

Pramod Sawant: 'हा हिंदू समाजाचा अपमान', राहुल गांधींनी माफी मागावी, गोव्याचे मुख्यमंत्री आक्रमक

Assagao case: पूजा शर्माची चौकशीला दांडी, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

SCROLL FOR NEXT