IPL Captains Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: आजपासून सुरू होणार 10 संघात थरार! कुठे, केव्हा अन् कशा पाहाणार मॅच? घ्या जाणून

Pranali Kodre

IPL 2023 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल. त्यापूर्वी या हंगामाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

यंदा तीन वर्षांनंतर आयपीएल पुन्हा पूर्वीच्या होम-अवे पद्धतीने होणार आहे, म्हणजेच संघ घरच्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर सामने खेळताना दिसणार आहेत. त्याचमुळे यंदा एकूण 12 शहरात साखळी फेरीचे सामने रंगणार आहेत. प्रत्येक संघ 7 सामने घरच्या मैदानावर आणि 7 सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर खेळणार आहे.

तब्बल 59 दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत 70 साखळी फेरीचे सामने आणि 4 प्लेऑफचे सामने खेळवले जाणार आहेत. सध्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, पण प्लेऑफचे वेळापत्रक समोर आलेले नाही. पण अंतिम सामन्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 28 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

कोणत्या शहरात होणार साखळी सामने

आयपीएल 2023 स्पर्धेतील 70 साखळी सामने 12 वेगवेगळ्या शहरात होणार आहेत. हे सामने चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, कोलकाता, लखनऊ, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, मोहाली, गुवाहाटी आणि धरमशाला या 12 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.

राजस्थान रॉयल्स त्यांचे घरच्या मैदानातील पहिले दोन सामने गुवाहाटीला खेळणार आहेत, त्यानंतर ते जयपूरला घरच्या मैदानातील उर्वरित 5 सामने खेळणार आहेत. त्याचबरोबर पंजाब किंग्स त्यांचे घरच्या मैदानातील 5 सामने मोहालीमध्ये खेळतील. त्यानंतर घरचे अखेरचे दोन सामने धरमशाला येथे खेळतील. अन्य आठ संघ त्यांचे घरचे सातही सामने त्यांच्या निर्धारित घरच्या मैदानावर खेळताना दिसतील.

किती वाजता सुरु होणार सामने

आयपीएल 2023 स्पर्धेत तब्बल 18 डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना दुपारी 3.30 वाजता होणार असून दुसरा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चालू होणार आहे. तसेच इतर दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता सामना होईल.

कुठे पाहाता येणार सामने

आयपीएल 2023 साठी टेलिव्हिजनवर सामना प्रक्षेपणाचे हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. तसेच डिजिटल प्रक्षेपणाचे हक्क म्हणजे ऑनलाईन स्ट्रिमिंगचे हक्क व्हायाकॉम 18 कडे आहेत. त्यामुळे जर सामने टीव्हीवर पाहायचे असतील, तर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेल्सवर पाहाता येणार आहेत.

तसेच जर सामने ऑनलाईन पाहायचे असतील, तर जिओ सिनेमा ऍप किंवा वेबसाईटवर पाहाता येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यंदा क्रिकेट चाहत्यांना जिओ सिनेमावर फ्रिमध्ये सामने पाहाता येणार आहेत. त्याचबरोबर इंग्लिश, तमिळ, हिंदी, तेलुगू, मराठी, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी अशा वेगवेगळ्या भाषेत सामने पाहाता येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

SCROLL FOR NEXT