Sunrisers Hyderabad Dainik Gomantak
क्रीडा

Sunrisers Hyderabad चं ठरलं! सोशल मीडियावर केली 'ही' मोठी घोषणा

IPL 2023 Sunrisers Hyderabad Captain: आयपीएल 2023 ला आता एक महिना बाकी आहे. सर्व संघांनी आपापली तयारी सुरु केली आहे.

Manish Jadhav

IPL 2023 Sunrisers Hyderabad Captain: आयपीएल 2023 ला आता एक महिना बाकी आहे. सर्व संघांनी आपापली तयारी सुरु केली आहे. यातच, बीसीसीआयने संपूर्ण वेळापत्रक जाहीर करुन आणखी खळबळ उडवून दिली आहे.

IPL 2023 च्या वेळापत्रकानुसार, पहिला सामना 31 मार्च रोजी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

दरम्यान, आयपीएलचे (IPL) दोन संघ आहेत, ज्यांनी अद्याप आपल्या कर्णधाराचे नाव जाहीर केलेले नाही. पण आता बातमी येत आहे की, गुरुवारी एक संघ आपल्या कर्णधाराची घोषणा करणार आहे. टीमने सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे.

SRH गुरुवारी आपल्या कर्णधाराची घोषणा करेल

आयपीएल 2023 मध्ये दहा संघ खेळताना दिसणार आहेत. आठ संघांचे कर्णधार निश्चित आहेत. पण दोन संघांना त्यांच्या कर्णधारांची नावे जाहीर करायची आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) असला तरी 30 डिसेंबरला त्याचा अपघात झाला, त्यामुळे आगामी सहा महिने तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्याला आयपीएलमध्येही सहभागी होता येणार नाही.

दरम्यान, संघाने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केलेली नाही. संघाचा पुढचा कर्णधार कोण असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. एवढेच नाही तर सनरायझर्स हैदराबादलाही त्यांचा कर्णधार निवडावा लागणार आहे.

संघाची कमान यापूर्वी केन विल्यमसनच्या हाती होती. पण संघाने त्याला सोडले आणि तो लिलावात दुसऱ्या संघासोबत गेला.

संघाने फक्त एकदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले, त्यानंतर 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघाने ट्रॉफीवर कब्जा केला.

यानंतर, 2018 मध्ये, संघ अंतिम फेरीत पोहोचला, परंतु विजेतेपद मिळवू शकला नाही. गेल्या काही वर्षांत संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. यावेळी फ्रँचायझी मालकांनी चांगलीच टीम तयार केली आहे.

मयंक अग्रवाल, एडन मार्कराम आणि भुवनेश्वर कुमार हे कर्णधारपदाचे दावेदार आहेत

जोपर्यंत कर्णधारपदाच्या दावेदारांचा संबंध आहे, पहिला आणि प्रमुख दावेदार एडन मार्कराम आहे, ज्याने या फ्रँचायझीच्या संघाला SA20 मध्ये विजय मिळवून दिला. एडन मार्कराम आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. अशा स्थितीत त्याचा दावा मजबूत मानला जात आहे.

यासोबतच मयंक अग्रवाललाही संघाने विकत घेतले असून तो संघासोबत आहे. मयंक अग्रवालने याआधी पंजाब किंग्जची कमान सांभाळली आहे, पण कर्णधार म्हणून त्याची कामगिरी काही विशेष झालेली नाही. त्यामुळे पंजाबने त्याला सोडले आणि आता तो SRH सोबत आहे.

तसेच, संघाचा आणखी एक खेळाडू कर्णधारपदाचा दावेदार आहे, तो भुवनेश्वर कुमार, जो गेली अनेक वर्षे याच संघाकडून आयपीएल खेळत आहे. पण एसआरएचचा नवा कर्णधार कोण असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

फलंदाज: हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग.

अष्टपैलू: समर्थ व्यास, सनवीर सिंग, मयंक डागर, विव्रत शर्मा, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर.

गोलंदाज: उमरान मलिक, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, अकील हुसेन, आदिल रशीद, मयंक मार्कंडे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT