Mayank Markande Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: मार्कंडेच्या कॅचने फिरवली मॅच! धोकादायक सॉल्टला असं केलं आऊट, पाहा Video

Video: दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या मयंक मार्कंडेने शानदार कॅच घेतला

Pranali Kodre

Mayank Markande catch: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी 40 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवण्यात आला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 9 धावांनी विजय मिळवला. हैदराबादच्या विजयासाठी मंयक मार्कंडेने त्याच्याच गोलंदाजीवर घेतलेला एक झेल महत्त्वाचा ठरला.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्लीसमोर 198 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने डेव्हिड वॉर्नरची विकेट पहिल्याच षटाकत शुन्यावर गमावली होती. पण नंतर फिलिप सॉल्ट आणि मिचेल मार्श यांनी दिल्लीचा डाव सांभाळताना काही आक्रमक फटकेही मारले. त्यांनी पाहाता पाहाता शतकी भागीदारी करत दिल्लीला भक्कम स्थितीत उभे केले होते. त्या दोघांचे अर्धशतकही झाले होते आणि ते खेळपट्टीवर पूर्ण स्थिर झाले होते.

पण त्याचवेळी 12 व्या षटकात मयंक मार्कंडे गोलंदाजीला आला. त्याने टाकलेल्या या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सॉल्टने जोरदार फटका मारला. पण त्याचवेळी मार्कंडेने चपळाई दाखवली आणि त्याने लगेचच चेंडू झेलला. त्यामुळे सॉल्टला 35 चेंडूत 9 चौकारांसह 59 धावांवर असताना बाद होऊन माघारी परतावे लागले.

यानंतर मात्र, सनरायझर्स हैदराबादने सामन्यात पुनरागमन केले. कारण त्यानंतर लगेचच मार्श 39 चेंडूत 1 चौकार आणि 6 षटकारांसह 63 धावा करून बाद झाला. तसेच मनिष पांडे (1), प्रियम गर्ग (12), सर्फराज खान (9) हे स्वस्तात माघारी परतले.

अखेरीस अक्षर पटेलने रिपल पटेलसह आक्रमकता दाखवली, पण तोपर्यंत सामना दिल्लीपासून बराच दूर गेला होता. अक्षरने नाबाद 29 धावा केल्या. तसेच रिपल 11 धावांवर नाबाद राहिला. दिल्लीला 20 षटकात 6 बाद 188 धावाच करता आल्या.

मार्कंडनेने यासामन्यात शानदार गोलंदाजी करताना 4 षटकात 20 धावा देत 2 विकेटस घेतल्या.

तत्पूर्वी हैदराबादकडून अभिषेक शर्माने 67 धावांची आणि हेन्रिक क्लासेनने नाबाद 51 धावांची खेळी केली होती. त्यामुळे हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 197 धावा उभारल्या होत्या. दरम्यान, दिल्लीकडून मार्शने फलंदाजीपूर्वी गोलंदाजीतही कमाल दाखवली होती. त्याने गोलंदाजी करताना सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

SCROLL FOR NEXT