Sunil Gavaskar & Irfan Pathan Dainik Gomantak
क्रीडा

रश्मिकाचा नाटू नाटूवर डान्स पाहून गावसकरांनाही आवरला नाही मोह, इरफान पठाणबरोबर थिरकताना Video Viral

Pranali Kodre

Sunil Gavaskar, Irfan Pathan dance: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला शुक्रवारी (31 मार्च) सुरुवात झाली. आयपीएलच्या या 16 व्या हंगामाचा उद्घाटन सोहळा सेलिब्रेटींच्या परफॉर्मन्सने रंगला होता. याच सोहळ्याचा भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर इरफान पठाणबरोबर आनंद घेताना दिसले. त्या दोघांच्या डान्सचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात अरिजीत सिंग, तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना यांनी परफॉर्मन्स केले होते. दरम्यान, रश्मिकाने 'नाटू, नाटू' या आरआरआर चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावरही डान्स केला होता.

तिला या गाण्यावर डान्स करताना पाहून गावसकरांनाही डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी डान्स करण्यास सुरुवात केली. याचवेळी त्यांनी इरफान पठाणलाही बोलवून घेतले आणि मग दोघांनी मिळून डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ इरफान पठाणने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्याने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की 'कोणी डान्स चांगला केला. मी आणि गावसकरांनी की रश्मिका मंदानाने'. सध्या या व्हिडिओला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 'नाटू, नाटू' या गाण्याला या वर्षीचा ऑक्सर पुरस्कार देखील मिळाला आहे.

यापूर्वीही याच सोहळ्यादरम्यानचा गावसकरांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यावेळी एका ऑस्ट्रेलियन प्रेझेंटरने गावसकरांच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये गावसकर सामी सामी गाण्यावर डान्स करताना दिसले होते. त्यात ते रश्मिकाच्या डान्स स्टेप्सची कॉपी करतानाही दिसले होते.

गावसकर हे सध्या आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी समालोचन करत आहेत. आयपीएल ही स्पर्धा पुन्हा जुन्या रंगात परतली असल्याने प्रत्येक संघ ७ सामने आपल्या घरच्या मैदानावर आणि ७ सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात खेळणार आहेत. त्यामुळे एकूण १२ शहरांमध्ये हे सामने होणार आहेत. तसेच १० संघांमध्ये मिळून ७० साखळी सामने होणार आहेत. या हंगामाचा अंतिम सामना २८ मे रोजी पार पडणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT