Ruturaj Gaikwad, IPL 2023: ऋतुराज गायकवाडचा ‘कार तोड’ शॉट, Video पाहून तुम्ही म्हणाल...

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या सहाव्या सामन्यात ऋतुराज गायकवाडची अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली.
Ruturaj Gaikwad
Ruturaj GaikwadDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या सहाव्या सामन्यात ऋतुराज गायकवाडची अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. ऋतुराजने गेल्या सामन्यात 92 धावा केल्या होत्या.

आता त्याने लखनऊविरुद्धही ताबडतोब फलंदाजी केली. गायकवाडने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. ऋतुराजने 31 चेंडूत 57 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले.

दरम्यान, ऋतुराजने आपल्या तिसऱ्या षटकारादरम्यान मैदानाबाहेर लावण्यात आलेल्या कारचे नुकसान केले. त्याने पाचव्या षटकात तीन षटकार ठोकले.

कृष्णप्पा गौतमच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडने सरळ षटकार ठोकला. यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर लाँग ऑफवर षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर गायकवाडने कव्हर्सवर षटकार मारला आणि तितक्यात चेंडू तिथे उभ्या असलेल्या कारला लागला.

Ruturaj Gaikwad
IPL 2023: SRH, CSK, PBKS, GT साठी आनंदाची बातमी, दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू...

ऋतुराजने चेन्नईला दमदार सुरुवात करुन दिली

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) चेन्नईला दमदार सुरुवात करुन दिली. कॉनवेच्या मदतीने ऋतुराजने पॉवरप्लेमध्ये 79 धावा केल्या. चेपॉकमध्ये पहिल्यांदाच पॉवरप्लेमध्ये चेन्नईने एवढा स्कोअर केला आहे.

यानंतर दोन्ही फलंदाजांनी मिळून चेन्नईची धावसंख्या 8 षटकांत 100 च्या पुढे नेली. कॉनवे आणि ऋतुराजने तिसऱ्यांदा शतकी भागीदारी केली. आयपीएलमध्ये (IPL) पहिल्यांदाच चेन्नईच्या सलामीवीरांनी तीन शतकी भागीदारी केली आहे.

Ruturaj Gaikwad
IPL 2023: महेंद्रसिंग धोनी रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार 7 वा फलंदाज

तसेच, ऋतुराज गायकवाड या आयपीएल हंगामात 100 धावांचा टप्पा पार करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. ऋतुराजने 2 सामन्यात 149 धावा केल्या असून त्याची सरासरी 74.50 आहे. या खेळाडूचा स्ट्राईक रेटही 183.95 आहे. ऋतुराजने 2 सामन्यात 13 षटकार मारले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com