SRH Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: बॉलर्सनं रोखलं, त्रिपाठीनं ठोकलं! हैदराबादची पंजाबवर मात, धवनची एकाकी झुंज व्यर्थ

SRH vs PBKS: सनरायझर्स हैदराबादने रविवारी पंजाब किंग्सविरुद्धचा सामना जिंकत आयपीएल 2023 मधील पहिला विजय नोंदवला

Pranali Kodre

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 14 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सला 8 विकेट्सने पराभूत केले आहे. रविवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेला हा सामना जिंकत हैदराबादने आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिला विजय देखील नोंदवला. मात्र, पंजाबचा हा या हंगामातील पहिला पराभव ठरला.

या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादसमोर 144 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग सनरायझर्स हैदराबादने 17.1 षटकात 2 बाद 145 धावा करत सहज पूर्ण केला.

या सामन्यात पंजाबकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने शानदार सुरुवात केली होती. त्याने हॅरी ब्रुकला चौथ्याच षटकात 13 धावांवर बाद केले होते. त्यानंतर मयंक अगरवालही 21 धावा करून बाद झाला. त्याला राहुल चाहरने बाद केले. मात्र, त्यानंतर राहुल त्रिपाठीने हैदराबादच्या डावाची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्याला कर्णधार एडेन मार्करमची चांगली साथ मिळाली.

त्रिपाठीने त्याची खेळी उभारताना काही चांगले फटकेही खेळल. त्याने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. त्याने आणि मार्करमने शतकी भागदारी करत आणखी विकेट्स जाणार नाही याची काळजी घेतली. या शतकी भागीदारीबरोबरच त्रिपाठी आणि मार्करमने हैदराबादला विजय मिळवून दिला. त्रिपाठी 48 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 74 धावांवर नाबाद राहिला. तसेच मार्करम 21 चेंडूत 37 धावा करून नाबाद राहिला.

तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. हा निर्णय हैदाराबादच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. पण पंजाबकडून एका बाजूने कर्णधार शिखर धवन किल्ला लढवत होता.

मात्र, दुसऱ्या बाजूला पंजाबच्या फलंदाजांनी एकामागोमाग विकेट्स गमावल्या. दरम्यान, सॅम करनने शिखरला साथ देण्याचा प्रयत्न केला होता. पण तोही 22 धावा करून बाद झाला. अखेर शिखरला अखेरच्या विकेटसाठी मोहित राठीने साथ दिली.

या दोघांमध्ये शेवटच्या विकेटसाठी नाबाद 50 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे पंजाबला 20 षटकात 9 बाद 143 धावा करता आल्या. शिखर 66 चेंडूत 12 चौकार आणि 5 षटकारांसह 99 धावांवर नाबाद राहिला.

हैदराबादकडून मयंक मार्कंडेने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, यासाठी त्याने केवळ 15 धावा खर्च केल्या. तसेच मार्को यान्सिन आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

Operation Sindoor: भारताने अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावून लावला... 'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचा मोठा खुलासा VIDEO

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT