SRH vs KKR Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: हैदराबादच्या तोंडून हिरावला विजय! शेवटच्या बॉलवर कोलकाताने मारली बाजी

Pranali Kodre

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने 5 धावांनी विजय मिळवला. कोलकाता संघाचा हा चौथा विजय आहे, तसेच हैदराबादचा सहावा पराभव आहे.

या सामन्यात हैदराबादला अखेरच्या षटकात विजयासाठी 9 धावांची गरज होती. त्यावेळी हैदराबादकडून अब्दुल सामद आणि भुवनेश्वर कुमार फलंदाजी करत होते. तसेच कोलकाताकडून वरूण चक्रवर्ती गोलंदाजीसाठी उतरला.

त्याने या षटकात शानदार गोलंदाजी करताना केवळ तीन धावाच दिल्या. तसेच त्याने सामदची 21 धावांवर विकेटही घेतली. अखेरच्या चेंडूत हैदराबादला 6 धावा हव्या असताना भुवनेश्वर कुमारला एकही धाव घेता आली नाही. त्यामुळे हा सामना कोलकाताने अखेरच्या चेंडूवर जिंकला.

या सामन्यात कोलकाताने हैदराबादसमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला 20 षटकात 8 बाद 166 धावाच करता आल्या.

हैदराबादकडून अभिषेक शर्मा (9) आणि मयंक अगरवालने (18) डावाची सुरुवात केली होती. पण हे दोघेही लवकर बाद झाले. काही वेळात राहुल त्रिपाठी (20) आणि हॅरी ब्रुक यांनीही स्वस्तात विकेट्स गमावल्या. ब्रुकला तर भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे हैदराबादची अवस्था 7 षटके पूर्ण होण्यापूर्वीच 4 बाद 54 धावा अशी झाली होती.

पण नंतर कर्णधार एडन मार्करम आणि यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेन यांनी डाव सावरताना पाचव्या विकेटसाठी तब्बल 70 धावांची भागीदारी करत हैदराबादला विजयाच्या दिशेने आग्रेसर केले होते. पण त्यांची भागीदारी रंगलेली असताना 15 व्या षटकात क्लासेनला शार्दुल ठाकूरने बाद केले. क्लासेनने 20 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 36 धावांची खेळी केली.

तसेच मार्करम 17 व्या षटकात वैभर अरोरा विरुद्ध मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 40 चेंडूत 41 धावांची खेळी केली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर मात्र सामन्याला वळण मिळाले. अब्दुल सामदने अखेरीसपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण तो अखेरच्या षटकात बाद झाला. तसेच अन्य फलंदाजांना कोलकाताच्या चांगल्या गोलंदाजीसमोर खास काही करता आले नाही.

कोलकाताकडून वैभव अरोरा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच हर्षित राणा, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताकडून जेसन रॉय आणि रेहमनुल्लाह गुरबाद सलामीला फलंदाजीला उतरले होते. पण गुरबाज डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ पुढच्या षटकात वेंकटेश अय्यर 7 धावांवर बाद झाला. तसेच जेसन रॉय चांगल्या सुरुवातीनंतर 20 धावा करून कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर मयंक अगरवालकडे झेल देत बाद झाला.

त्यामुळे सुरुवातीला झटपट विकेट्स गमावल्याने कोलकाताचा संघ अडचणीत सापडला होता. पण नंतर कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी डाव सांभाळला. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण त्यांची भागीदारी धोकादायक ठरत असतानाच 12 व्या षटकात नितीश राणाला एडन मार्करमने स्वत:च्याच गोलंदाजीवर सुरेख झेल घेत माघारी धाडले. त्यामुळे नितीश आणि रिंकूमधील 61 धावांची भागीदारी तुटली. नितीशने 31 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 42 धावा केल्या.

यानंतर आंद्रे रसेलने रिंकूची साथ देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो 24 धावा करून 15 व्या षटकात बाद झाला. त्याच्यानंतर सुनील नारायण (1) आणि शार्दुल ठाकूर (8) यांच्याही झटपट विकेट्स गेल्या. तसेच एक बाजू सांभाळलेला रिंकू सिंगही अखेरच्या षटकात बाद झाला. त्याने 35 चेंडूत 46 धावांची खेळी करताना 4 चौकार आणि 1 षटकार मारला.

टी नटराजनने टाकलेल्या या अखेरच्या षटकात रिंकू बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर हर्षित राणा धावबाद झाला. अखेरीस अनुकूल रॉय 13 धावांवर आणि वैभव अरोरा 2 धावांवर नाबाद राहिले. त्यामुळे कोलकाताला 20 षटकात 9 बाद 171 धावा करता आल्या.

हैदराबादकडून मार्को यान्सिन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, एडन मार्करम आणि मयंक मार्कंडे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT