Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: दिल्लीचा सलग दुसरा विजय! गोलंदाज चमकले, घरच्या मैदानात हैदराबाद पराभूत

आयपीएल 2023 स्पर्धेत सोमवारी दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे.

Pranali Kodre

Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 34 वा सामना सोमवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने 7 धावांनी विजय मिळवला आहे. हा दिल्लीचा या हंगामातील सलग दुसरा विजय ठरला. दिल्लीच्या विजयात गोलंदाजांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने हैदराबादसमोर विजयासाठी 145 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकात 6 बाद 137 धावाच करता आल्या.

हैदराबादकडून 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला मयंक अगरवाल आणि हॅरी ब्रुक उतरले होते. त्यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. पण सहाव्या षटकात ब्रुक 7 धावा करून बाद झाला. पण नंतर मयंकने राहुल त्रिपाठीबरोबर डाव सावरण्याचा प्रयत्न केला.मात्र, मयंकला 12 व्या षटकात अक्षर पटेलने बाद केले. मयंकने 39 चेंडूत सर्वाधिक 49 धावांची खेळी केली.

त्यानंतर मात्र, हैदराबादची धावगती मंदावली आणि त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. राहुल त्रिपाठी 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा (5) आणि एडेन मार्करम (3) यांनीही स्वस्तात विकेट्स गमावल्या. अखेरीस हेन्रिक क्लासेन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 41 धावांची भागीदारी करत हैदराबादला विजयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.

पण ऐन मोक्याच्या क्षणी क्लासेन 19 चेंडूत 31 धावांवर बाद झाला. त्याला एन्रिक नॉर्कियाने बाद केले. अखेरच्या षटकात 13 धावांची गरज हैदराबादला होती. पण या षटकात गोलंदाजी करताना मुकेश कुमारने केवळ 5 धावा दिल्या. त्यामुळे हैदराबादने हा सामना केवळ 7 धावांनी गमावला. दिल्लीकडून गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दिल्लीकडून एन्रिक नॉर्किया आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादव आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी दिल्लीने या सामन्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने फिलिप सॉल्टला बाद करत भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर मिचेल मार्शही 15 चेंडूत 25 धावा करून बाद झाला.

यानंतर 8 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने दिल्लीला तिहेरी धक्के दिले. त्याने कर्णधार डेव्हिड वॉर्नरला 21 धावांवर आणि सर्फराज खानला 10 धावांवर बाद केले. तसेच याच षटकात त्याने अमन हकिम खान यालाही ४ धावांवर बाद केले. त्यामुळे 5 बाज 65 धावा अशा कठीण परिस्थितीत दिल्ली सापडली.

मात्र त्यानंतर अक्षर पटेल आणि मनिष पांडे यांच्यात झालेल्या भागीदारीने दिल्लीचा डाव सावरला. त्यांनी 69 धावांची भागीदारी केली. त्यामुळे दिल्लीने 130 धावांचा आकडा पार केला. पण 18 व्या षटकात अक्षर 34 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. तसेच पुढच्या षटकात मनिषही 27 चेंडू 34 धावा करून धावबाद झाला. अखेरच्या षटकात रिपल पटेल (5) आणि एन्रिक नॉर्किया (2) धावबाद बाद झाले. त्यामुळे दिल्लीला 20 षटकात 9 बाद 144 धावा करता आल्या.

हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमारनेही चांगली गोलंदाजी करताना 4 षटकात केवळ 11 धावा देताना 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर टी नटराजन याने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

SCROLL FOR NEXT