IPL 2023: पंजाब किंग्स संघ शिखर धवन आणि लियाम लिव्हिंगस्टोन या दोघांच्या फिटनेस अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहे.
मात्र, यादरम्यान टीमला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. गुरुवारी आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी दोन्ही खेळाडू बुधवारी मैदानावर पोहोचले.
पंजाब किंग्जने ट्विटरवर दोन्ही खेळाडूंच्या सरावाचे अपडेट दिले आहेत. मात्र, दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसबाबत फ्रँचायझीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
दरम्यान, कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही, त्याच्या अनुपस्थितीत सॅम करनने संघाचे नेतृत्व केले.
दुसरीकडे, लिव्हिंगस्टोनने आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये एकही सामना खेळलेला नाही. वृत्तानुसार, पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याच्या 24 तास आधी या जोडीची फिटनेस चाचणी होईल. धवनच्या खांद्याला दुखापत झाल्याची पुष्टी करनने केली होती.
इनसाइडस्पोर्टच्या बातमीनुसार, दुखापतींबद्दल विचारले असता, पीबीकेएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले - सध्या काहीही सांगता येणार नाही. पुढच्या सामन्याची वेळ झाली आहे. आम्हाला सामन्याच्या 24 तास आधी फिजिओकडून अपडेट मिळेल.
गेल्या सामन्यादरम्यान गब्बर डगआउटमध्ये होता. आता मात्र त्याचे पुनरागमन होण्याची चिन्हे आहेत. त्याच्या अनुपस्थितीत, अथर्व तायदेचे पदार्पण होणार आहे, तर हरप्रीत भाटियालाही पहिल्या आयपीएल (IPL) सामन्यासाठी तयार करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.