KKR Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पहिला सामना सुरु असतानाच KKR ला धक्का! 'हे' परदेशी खेळाडू लगेच होणार नाही टीममध्ये सामील

कोलकाता नाईट रायडर्सचे दोन प्रमुख परदेशी खेळाडू पुढील काही सामन्यांना मुकणार आहेत.

Pranali Kodre

Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेला शुक्रवारी सुरुवात झाली. या स्पर्धेत शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स त्यांचा पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळला. पण याचदरम्यान केकेआरला धक्का देणारी एक बातमी आली आहे. त्यांच्या संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू पुढील काही सामन्यांना मुकणार आहेत.

हे दोन खेळाडू म्हणजे शाकिब अल हसन आणि लिटन दास. सध्या हे दोन्ही खेळाडू बांगलादेशमध्येच आहेत. सध्या आयर्लंडचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात या दोन्ही संघात वनडे आणि टी२० मालिका झाली आहे. आता एकमेव कसोटी सामना बाकी आहे. या कसोटी सामन्यासाठी शाकिब आणि लिटन या दोघांचाही बांगलादेश संघात समावेश आहे.

त्याचमुळे राष्ट्रीय संघाच्या वचनबद्धतेमुळे या दोघांनाही किमान ८ एप्रिलपर्यंत भारतात येता येणार नाही. बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना ४ ते ८ एप्रिल दरम्यान होणार आहे. या सामन्यात शाकिब आणि लिटन खेळताना दिसू शकतात. त्याचमुळे हा सामना संपल्यानंतरच ते केकेआरसाठी उपलब्ध राहणार आहेत.

याआधी या दोन्ही क्रिकेटपटूंना बांगलादेशकडून आयपीएलमध्ये सुरुवातीपासून सामील होण्याची परवानगी मिळेल अशी चर्चा होत होती. पण आता त्यांची कसोटी सामन्यासाठी बांगलादेश संघात निवड झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता केकेआरकडून सुरुवातीचे काही सामन्यांना त्यांना मुकावे लागेल.

हे दोघेही नुकतेच आयर्लंडविरुद्ध टी२० मालिकेत खेळले होते. या दोघांनीही या मालिकेत दमदार कामगिरीही केली होती. लिटनने सर्वात जलद टी२० अर्धशतक करण्याचा विक्रमही केला होता. तसेच शाकिब फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात महत्त्वाची भूमिका निभावतो.

याच कारणामुळे सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या या दोन्ही खेळाडूंची केकेआरला प्रतिक्षा आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे केकेआरला ८ एप्रिलपर्यंत पंजाब किंग्सनंतर आता फक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध एकच सामना खेळायचा आहे. त्यामुळे त्यानंतरच्या सामन्यांसाठी शाकिब आणि लिटन केकेआरसाठी उपलब्ध होऊ शकतात.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे केकेआरचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे अनुपलब्ध आहे. त्याच्याऐवजी नितीश राणा केकेआरचे नेतृत्व करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT