MS Dhoni | Hardik Pandya
MS Dhoni | Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: ठरलं तर! 'या' दिवशी होणार आयपीएलच्या 16 व्या सिजनचा श्रीगणेशा

Pranali Kodre

IPL 2023: इंडियन सुपर लीग म्हणजेच आयपीएलचा यंदा 16 वा हंगाम खेळवला जाणार आहे. हा हंगाम कधी सुरु होणार आहे, याबद्दल आता माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार 31 मार्चपासून आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात होईल.

या हंगामात पहिलाच सामना गतविजेते गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर या हंगामाचा अंतिम सामना 28 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. दरम्यान अद्याप प्लेऑफमधील सामन्यांच्या पूर्ण वेळापत्रक अद्याप घोषित झाले नाही.

त्याचबरोबर साल 2019 नंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये होम-अवे प्रकारात सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजे यंदा प्रत्येक संघ घरच्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानांवर सामने खेळताना दिसणार आहेत. प्रत्येक संघ 7 सामने घरच्या मैदानावर आणि 7 सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर खेळणार आहे.

हा हंगाम पहिला वूमन्स प्रीमियर लीगचा हंगाम संपल्यानंतर पाच दिवसांनी सुरू होणार आहे. 26 मार्च रोजी डब्ल्यूपीएलचा हंगाम संपणार आहे. दरम्यान, आयपीएल 2023 हंगामात साखळी फेरीत 70 सामने खेळवले जाणार असून हे सामने 31 मार्च ते 21 मे दरम्यान होतील. तसेच त्यानंतर प्लेऑफचे सामने खेळवले जातील.

यंदा साखळी फेरीतील 70 सामने 52 दिवसात चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, कोलकाता, लखनऊ, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर, मोहाली, गुवाहाटी आणि धरमशाला या १२ शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.

तसेच राजस्थान रॉयल्स त्यांचे घरच्या मैदानातील पहिले दोन सामने गुवाहाटीला खेळणार आहेत, त्यानंतर ते जयपूरला घरच्या मैदानातील उर्वरित ५ सामने खेळणार आहेत. त्याचबरोबर पंजाब किंग्स त्यांचे घरच्या मैदानातील ५ सामने मोहालीमध्ये खेळतील. त्यानंतर घरचे अखेरचे दोन सामने धरमशाला येथे खेळतील.

तसेच यंदा तब्बल 18 डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरला 1 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. यादिवशी पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात मोहाली मध्ये होणार आहे. तसेच दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात लखनऊ येथे होणार आहे.

डबल हेडरच्या दिवशी पहिला सामना दुपारी 3.30 वाजता होणार असून दुसरा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चालू होणार आहे. तसेच इतर दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता सामना होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

Goa Today's Live News: गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार - मुख्यमंत्री डॉ. सावंत

Sam Pitroda: ‘’भारतात पूर्वेकडील लोक चिनी तर दक्षिणकेडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात...’’ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा पुन्हा बरळले

SCROLL FOR NEXT