R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: सर्वोत्तम कॅचनेच दिला घाव! संजू सॅमसननं सांगितलं बटलर ऐवजी अश्विनने ओपनिंग करण्याचं कारण

पंजाब किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून बटलरऐवजी आर अश्विनने ओपनिंग करण्यामागचे कारण संजू सॅमसनने स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

RR vs PBKS: बुधवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील आठव्या सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध 5 धावांनी विजय मिळवला. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर झालेला हा सामना चांगलाच रोमांचक झाला होता. दरम्यान, या सामन्यात राजस्थानकडून सलामीला फलंदाजीसाठी आर अश्विन उतरण्यामागील कारण संजू सॅमसनने स्पष्ट केले आहे.

या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 198 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून सलामीला यशस्वी जयस्वालबरोबर आर अश्विन उतरला होता. पण या दोघांच्याही विकेट्स अर्शदीप सिंगने स्वस्तात घेतल्या. त्याने जयस्वालला 11 धावांवर बाद केले, तर अश्विन चार चेंडू खेळूनही शुन्यावरच बाद झाला.

पण, साधारणपणे राजस्थानकडून सलामीला जयस्वालबरोबर जोस बटलर येतो. मात्र, या सामन्यात बटलर ऐवजी अश्विन का आला होता, असा प्रश्न अनेकांना पडला होता. याचे उत्तर सामन्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने दिले आहे.

त्याने सांगितले की बटलरला क्षेत्ररक्षण करत असताना एक छोटी दुखापत झाली होती. त्यामुळे त्यावर उपचारासाठी काही वेळ हवा होता. म्हणून बटलर या सामन्यात सलामीला न येता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

खरंतर याच सामन्यात पंजाबचा फलंदाज शाहरुख खानचा झेल घेताना बटलरच्या बोटाला दुखापत झाली. त्याने डीपच्या क्षेत्रातून पळत येत शाहरुखचा शानदार झेल घेतला होता. हा सामन्यातील सर्वोत्तम झेल देखील ठरला, त्याचा पुरस्कारही सामन्यानंतर बटलरला मिळाला होता. हा पुरस्कार घ्यायला येतानाही बटलरच्या बोटाला बँडेड पट्टी बांधलेली होती.

सामन्यानंतर संजू सॅमसनने सांगितले की 'बटलरला क्षेत्ररक्षण करत असताना छोटी दुखापत झाली आहे. त्याच्या बोटाला टाके घालण्यासाठी फिजिओकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे अश्विनला पुढे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि बाकी सर्वांना मागे ठेवण्यात आले. बटलर बरा आहे. पण त्याला सध्या टाके घालण्यात आले आहेत. त्याने चांगली फलंदाजी केली आणि तो बरा असायला हवा.'

या सामन्यात बटलरने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो 11 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. दरम्यान, या सामन्यात राजस्थानने 15 व्या षटकापर्यंत 124 धावांत 6 विकेट्स गमावल्या होत्या.

पण सातव्या विकेटसाठी शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी 62 धावांची दमदार भागीदारी करत राजस्थानला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण अखेरच्या क्षणी त्यांचे प्रयत्न अपयशी ठरली.

दरम्यान, आता सॅमसन पुढच्या सामन्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही, हे राजस्थानला पाहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT