Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: एमएस धोनीला मागे टाकत रोहीतने केली कमाल, 19व्यांदा जिंकला 'हा' किताब!

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्याने आता महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे.

रोहितने सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला

रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तर महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत रोहितने धोनीला या बाबतीत मागे टाकले आहे. एमएस धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 17 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला आहे.

सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच जिंकणारे भारतीय

रोहित शर्मा- 19 किताब

एमएस धोनी- 17 किताब

युसूफ पठाण- 16 किताब

विराट कोहली- 14 किताब

सुरेश रैना- 14 किताब

मुंबई इंडियन्स जिंकली

मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी शानदार सुरुवात केली. रोहितने 45 चेंडूत 65 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. समन्वयाअभावी ईशान किशन धावबाद झाला. त्याने 31 धावांची शानदार खेळी खेळली.

याशिवाय, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तिलक वर्माने 41 धावा केल्या. मात्र, स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा खातेही उघडू शकला नाही आणि धावा न करताच बाद झाला.

दुसरीकडे, कॅमेरुन ग्रीन आणि टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात मुंबईला विजय मिळवून दिला. कर्णधार रोहित शर्मा आणि पियुष चावला यांनी मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी केली.

तसेच, दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) गोलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने 2 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. तर मुस्तफिजुर रहमानने 1 बळी घेतला.

दिल्ली कॅपिटल्सने 173 धावांचे लक्ष्य दिले होते

कर्णधार डेव्हिड वॉर्नरशिवाय (David Warner) दिल्ली कॅपिटल्ससाठी कोणताही खेळाडू म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ अवघ्या 15 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर मनीष पांडेने 26 धावा केल्या. त्यानंतर पदार्पण करणारा यश धुलही केवळ 2 धावा करुन बाद झाला. ललित यादवने 2 धावांचे योगदान दिले.

कर्णधार वॉर्नरने 47 चेंडूंत 6 चौकारांसह 51 धावा केल्या. शेवटी अक्षर पटेलने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या 25 चेंडूत 54 धावा केल्या. अभिषेक पोरेलने 1 धाव, कुलदीप यादव शून्यावर आऊट झाला. अक्षर पटेलमुळेच दिल्ली कॅपिटल्सला 172 धावांपर्यंत मजल मारता आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

Viral Video: सायकलस्वाराचा जीवघेणा स्टंट! सोशल मीडियावर खरतनाक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला लवकर मरायचंय का?'

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

SCROLL FOR NEXT