Mahendra Singh Dhoni & Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 पूर्वी मुंबई इंडियन्सने या खेळाडूला वगळले, CSK मध्येही मोठे बदल

Mumbai Indians Chennai Super Kings: आयपीएल ही जगातील सर्वात यशस्वी लीग आहे.

दैनिक गोमन्तक

Mumbai Indians Chennai Super Kings: आयपीएल ही जगातील सर्वात यशस्वी लीग आहे. अनेक स्टार क्रिकेटपटूंनी इथे खेळून आपली कारकीर्द घडवली आहे. या धमाकेदार लीगमध्ये खेळून खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळते. आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. याआधीच, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया...

मुंबई इंडियन्सने हा स्टार सोडला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्डला रिलीज केले आहे. पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत होता, परंतु आयपीएल 2022 मध्ये तो चांगली कामगिरी करु शकला नाही. आयपीएल 2022 च्या 11 सामन्यांमध्ये पोलार्डला केवळ 141 धावा करता आल्या. पोलार्डशिवाय फॅबियन अ‍ॅलन, मयंक मार्कंडे, हृतिक शोकिन आणि टायमल मिल्स यांनाही रिलीज करण्यात आले आहे.

मुंबई इंडियन्सने या खेळाडूंना कायम ठेवले

मुंबई इंडियन्सने एकूण 10 खेळाडूंना कायम ठेवले आहे. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), देवाल्ड ब्रेविस, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डॅनियल सायम्स, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवण्यात आले आहे.

पाच वेळा विजेतेपद पटकावले

मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा हंगाम दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता. जिथे संघ प्लेऑफसाठीही पात्र ठरु शकला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

चेन्नईने हा बदल केला

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. सीएसकेसाठी मागचा सीझन खूपच खराब होता. जेव्हा संघ फक्त 4 सामने जिंकू शकला होता. सुरुवातीला संघाचा कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) होता, पण नंतर महेंद्रसिंग धोनी कर्णधार झाला.

जडेजा सीएसकेकडून खेळणार

चेन्नई सुपर किंग्जने 9 खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्याचवेळी चार खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे. महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस आणि दीपक चहर आयपीएल 2023 मध्ये सीएसकेकडून खेळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT