Supreme Court On IPL: IPL बंद होणार? सर्वोच्च न्यायालयाने दिला हा मोठा निर्णय

Indian Premier League: इंडियन प्रीमियर लीग (IPL) विरोधात गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
IPL
IPL Dainik Gomantak

Supreme Court of India On IPL: इंडियन प्रीमियर लीग (IPL) विरोधात गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत दिल्लीतील एका व्यक्तीने आयपीएल सामन्यांवर बंदी घालण्याचे निर्देश मागितले होते. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

त्यामुळे आयपीएल बंद करण्याची मागणी होत होती

गेल्या वर्षी आयपीएल 2021 कोरोना महामारीच्या दरम्यान खेळली गेली. आयपीएलची ही मालिका 2 भागात झाली. IPL 2021 ची सुरुवात भारतातच झाली होती, पण अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ही स्पर्धा UAE मध्ये खेळवली गेली. भारतात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांदरम्यान सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत सामन्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

IPL
IPL Player Arrested: क्रिकेटपटू संदीप लामिछाने याला अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या आरोपावरून अटक

सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला

महामारीच्या काळात आयपीएलचे सामने आयोजित करण्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, 'कालांतराने काही याचिका अप्रासंगिक बनल्या आहेत.' सरन्यायाधीश U.U. लळित आणि न्यायमूर्ती एस.आर. भट यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'या याचिकेवर सुनावणी करण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही.'

सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने खंडपीठाला सांगितले की, 'कोविड-19 च्या उद्रेकादरम्यान, शहरांमध्ये लॉकडाऊन लागू असताना ही याचिका दाखल करण्यात आली होती.' मात्र आता ती अप्रासंगिक झाली आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.

IPL
IPL 2023: मार्क बाऊचरची मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

2008 पासून आयपीएल खेळले जात आहे

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची सुरुवात 2008 साली झाली. या लीगचे आतापर्यंत 15 हंगाम खेळले गेले आहेत. इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीझन याच वर्षी भारतात (India) खेळला गेला. ही लीग जगातील सर्वात मोठ्या लीग आहे. या लीगमध्ये जगातील सर्व प्रमुख संघांचे खेळाडू सहभागी होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com