Faf du Plessis and Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: फाफ-विराटच्या वादळात मुंबई इंडियन्सची दाणादाण! RCB चा चिन्नास्वामीवर मोठा विजय

आयपीएल २०२३ स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव केला.

Pranali Kodre

Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबई इंडियन्सविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. बेंगलोरने घरच्या मैदानावर विजय मिळवत या स्पर्धेचीही विजयी सुरुवात केली आहे.

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने आरसीबीसमोर 172 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान आरसीबीने 16.2 षटकात दोन विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसबरोबर विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी उतरले. या दोघांनीही दमदार सुरुवात आरसीबीला दिली.

दोघांनीही आक्रमक फलंदाजी करताना तब्बल 148 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यान दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली. त्यांनी केलेल्या भागीदारीमुळे आरसीबीच्या विजयाचा पाया रचला गेला. त्यांची भागीदारी 15 व्या षटकात अर्शद खानने तोडली. त्याने फाफ डू प्लेसिसला टीम डेव्हिडच्या हातून झेलबाद केले. डू प्लेसिसने 43 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांसह 73 धावांची खेळी केली.

त्यानंतर पुढच्याच षटकात कॅमेरॉन ग्रीनने दिनेश कार्तिकला शुन्यावर माघारी धाडले. पण नंतर ग्लेन मॅक्सवेलने फलंदाजीला येत 3 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 12 धावा केल्या. तसेच दुसऱ्या बाजूने विराटनेही आपली लय कायम ठेवत फलंदाजी केली आणि सामना आरसीबीला जिंकून दिला. विराट अखेरीस 49 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 82 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी आरसीबीने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला फलंदाजीला प्रथम आमंत्रित केले होते. पण मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यांनी इशान किशन (10), कॅमेरॉन ग्रीन (5) आणि रोहित शर्मा (1) यांच्या विकेट्स 20 धावांच्या आतच गमावल्या. तसेच सूर्यकुमार यादवही 15 धावा करून बाद झाला.

नेहाल वधेराने युवा तिलक वर्माला चांगली साथ दिली. त्यांची भागीदारी रंगतही होती. पण अशातच वधेराला कर्ण शर्माने 21 धावांवर बाद केले. कर्णने धोकादायक टीम डेव्हिडलाही 4 धावांवर माघारी धाडले.

अखेरच्या काही षटकांमध्ये अर्शद खानने तिलकला चांगली साथ दिली. तिलकने आक्रमक पवित्रा घेत अर्धशतक तर पूर्ण केलेच पण मुंबईला 150 धावांचा टप्पाही पार करून दिला. तो 46 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 84 धावा करून नाबाद राहिला. तर अर्शद 9 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे मुंबईला 20 षटकात 7 बाद 171 धावांपर्यंत पोहोचता आले.

आरसीबीकडून कर्ण शर्माने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज, रिस टोपली, आकाश दीप आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT