IPL 2023: SRH vs RR सामन्यापूर्वी का पाळलं खेळाडू अन् अधिकाऱ्यांनी मौन? जाणून घ्या कारण

आयपीएल 2023 मधील चौथ्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघांतील खेळाडूंनी आणि सामनाधिकाऱ्यांनी मौन पाळले होते.
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals
Sunrisers Hyderabad vs Rajasthan RoyalsDainik Gomantak
Published on
Updated on

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी डबल हेडर म्हणजेच दोन सामने खेळवण्यात येणार आहे. यातील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळवण्यात येत आहे. पण या सामन्याआधी दोन्ही संघातील खेळाडूंनी आणि सामनाधिकाऱ्यांनी मौन पाळले होते, तसेच खेळाडूंनी दंडाला काळी पट्टीही बांधली आहे.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियवर होत असलेल्या या सामन्यात नाणेफेकीनंतर दोन्ही खेळाडूंनी आणि सामनाधिकाऱ्यांनी मैदानावर प्रवेश करण्यापूर्वी एक मिनिट मौन पाळले. यामागे कारण असे की रविवारी सकाळी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांचे निधन झाले.

त्यामुळे त्यांनाच आदरांजली वाहण्यासाठी सामन्यादरम्यान मौन पाळण्यात आले होते. तसेच खेळाडूंनी त्यांच्या सन्मानार्थ दंडाला काळी पट्टी देखील बांधली आहे.

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals
हार्दिकचं टेंशन वाढलं! केन विलियम्सन IPL 2023 मधून 'या' कारणानं बाहेर

दुर्रानी 88 वर्षांचे होते. ते गुजरातमधील जामनगरमध्ये राहायचे. त्यांचा जन्म काबुल, अफगाणिस्तानमध्ये झाला होता. पण त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. त्यांनी भारताकडून 1960 ते 1973 दरम्यान क्रिकेट खेळले.

प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारणारे क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख होती. ते अर्जुन पुरस्कार जिंकणारे पहिले क्रिकेटपटूही ठरले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारतासाठी 29 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी 1202 धावा केल्या होत्या आणि 75 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच त्यांनी त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत 170 प्रथम श्रेणी सामने खेळताना 8545 धावा केल्या होत्या आणि 484 विकेट्सही घेतल्या होत्या. त्यांनी ३ लिस्ट ए सामनेही खेळले, ज्यात त्यांनी 34 केल्या आणि 4 विकेट्स घेतल्या.

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals
IPL 2023, LSG vs DC: घरच्या मैदानावर लखनऊचा विजय! मेयर्स-वूडचं तुफान दिल्लीला पडलं भारी

दुर्रानी यांनी 1961-62 मध्ये इंग्लंडला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशा फरकाने पराभूत करण्यासाठी भारतीय संघाकडून मोलाचा वाटा उचलला होता. त्यांनी त्या मालिकेत कोलकाता आणि चेन्नई (तेव्हाचे मद्रास) कसोटीत अनुक्रमे 8 आणि 10 विकेट्स घेतल्या होत्या.

दुर्रानी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे याचवर्षी जानेवारी महिन्यात मांडीचे हाड फ्रॅक्चर झाल्याने शस्त्रक्रिया झाली होती. दुर्रानी यांच्या निधनाबद्दल भारत भरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com