Kolkata Knight Riders Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: फलंदाजांच्या वादळानंतर, गोलंदाजांची कमाल! कोलकाताने रोखला बेंगलोरचा विजय रथ

आयपीएलमध्ये बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2023 बुधवारी 36 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. या सामन्यात कोलकाताने 21 धावांनी विजय मिळवला. हा कोलकाताचा हंगामातील तिसरा विजय मिळवला आहे. मात्र बेंगलोरने सलग दोन विजयांनंतर पराभव स्विकारला आहे.

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने दिलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 20 षटकात 8 बाद 179 धावाच करता आल्या.

या सामन्यात 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून प्रभारी कर्णधार विराट कोहली आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरलेल्या फाफ डू प्लेसिसने डावाची सुरुवात केली. त्यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र चांगल्या सुरुवातीनंतर फाफ डू प्लेसिसला 17 धावांवर सुयश शर्माने बाद केले.

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकांवर फलंदाजीला उतरलेला शाहबाज अहमदही 2 धावा करून सुयश शर्माच्याच गोलंदाजीवर पायचीत झाला. ग्लेन मॅक्सवेलही फार काही करू शकला नाही. त्याला 5 धावांवर वरुण चक्रवर्तीने बाद केले. त्यामुळे बेंगलोरने पॉवरप्ले संपायच्या आतच तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या.

मात्र, त्यानंतर विराटने महिपाल लोमरोरला साथीला घेत डाव पुढे नेला. या दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. पण महिपाल 12 व्या षटकात 34 धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात अर्धशतक केलेला विराटही आंद्र रसेलविरुद्ध खेळताना वेंकटेश अय्यरकडे झेल देत बाद झाला. विराटने बेंगलोरकडून सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. त्याने 37 चेंडूत ही खेळी करताना 6 चौकार मारले.

कठीण परिस्थितीत सापडलेल्या बेंगलोरचा डाव दिनेश कार्तिक आणि सुयश प्रभुदेसाईने पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. पण या दोघांमध्ये समन्वयाचा गोंधळ झाला आणि सुयशला 15 व्या षटकात 10 धावांवर धावबाद होऊन माघारी परतावे लागले.

वनिंदू हसरंगाही 5 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मात्र, बेंगलोरसाठी विजयाच्या आशा धुसर होत गेल्या. त्यातच दिनेश कार्तिकही 18 व्या षटकात 22 धावा करून बाद झाल्याने बेंगलोरच्या आशांना धक्का बसला. अखेरीस डेव्हिड विली 11 धावांवर आणि विजयकुमार वैशाख 13 धावांवर नाबाद राहिले, पण त्यांना बेंगलोरला विजय मिळवून देता आला नाही.

कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. सुयश शर्मा आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. पण कोलकाताकडून जेसन रॉय आणि एन जगदीशन यांनी चांगली सुरुवात दिली. एका बाजूने रॉयने आक्रमक खेळ केला, तर दुसरी बाजू जगदीशनने सांभाळली होती. त्यांनी सलामीला 83 धावांची भागीदारी केली. दरम्यान, रॉयने अर्धशतकही पूर्ण केले.

पण, त्यांची भागीदारी 10 व्या षटकात विजयकुमार वैशाखने तोडली. त्याने रॉय आणि जगदीशन दोघांनाही बाद केले. वैशाखने 10 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एन जगदीशनला 27 धावांवर बाद केले. यानंतर वैशाखने या षटकातील अखेरचा चेंडू लेग स्टंपजवळ यॉर्कर लेंथला टाकला. त्याचेंडूवर रॉय 56 धावांवर असताना त्रिफळाचीत झाला. रॉयने ही खेळी 29 चेंडूत करताना 4 चौकार आणि 5 षटकार मारले.

दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कोलकाताचा डाव कर्णधार नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांनी पुढे नेताना अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी 80 धावांची भागीदारी केली. पण या दोघांनाही 18 व्या षटकात बाद झाले. दोघांनाही वनिंदू हसरंगाने बाद केले. राणा 21 चेंडूत 48 धावा करून बाद झाला. तसेच वेंकटेशने 26 चेंडूत 31 धावा केल्या.

अखेरीस डेव्हिड विसे आणि रिंकू सिंगने काही आक्रमक शॉट्स खेळले. विसे 12 आणि रिंकू 18 धावांवर नाबाद राहिले. त्यामुळे कोलकाता 20 षटकात 5 बाद 200 धावांपर्यंत पोहचू शकले. बेंगलोरकडून वैशाख आणि हसरंगा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. तसेच मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT