IPL मध्ये पहिल्यांदाच बॅटिंग करताना अर्जुनचा खणखणीत षटकार, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

अर्जुन तेंडुलकरला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदाच आयपीएमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती.
Arjun Tendulkar
Arjun TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

Arjun Tendulkar 1st Six in IPL: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात गुजरातने 55 धावांनी विजय मिळवला. पण, असे असले तरी मुंबई इंडियन्सचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरने खालच्या फळीत फलंदाजीला येत सर्वांचे लक्ष वेधले होते.

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेल्या अर्जूनसाठी आयपीएलमधील हा चौथा सामना होता. पण यापूर्वी त्याला पहिल्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. मात्र, गुजरातविरुद्ध पीयुष चावलाची विकेट गेल्यानंतर अर्जुन 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता.

त्याने यावेळी 9 चेंडूंचा सामना करताना 13 धावा केल्या. तो अखेरच्या षटकात मोहित शर्माविरुद्ध मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. पण बाद होण्यापूर्वी त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला होता.

Arjun Tendulkar
काय आहे स्लो ओव्हर रेट नियम, ज्यामुळे IPL 2023 कर्णधारांना झालाय लाखोंचा दंड?

दरम्यान, अर्जुनने या सामन्यात 13 धावा केल्याने त्याने सचिनला एका गोष्टीमध्ये मागे टाकले आहे. सचिनने आयपीएलमध्ये 14 मे 2008 रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने एक चौकार आणि एका षटकारासह 12 धावा केल्या होत्या. पण अर्जुनने त्याच्या पहिल्या आयपीएल डावात सचिनपेक्षा 1 धाव जास्त केली आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अर्जुनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गोलंदाजी करताना पहिली आयपीएल विकेट घेतली होती. त्यानंतर सचिनने त्याचे कौतुक करताना म्हटले होते की आता कुटुंबात आयपीएल विकेट आली आहे. खरंतर सचिनला आयपीएलमध्ये एकही विकेट घेण्यात यश मिळाले नाही. पण अर्जुनने सचिनचे आयपीएल विकेट घेण्याची अपूर्ण इच्छा पूर्ण केली.

Arjun Tendulkar
रोहितसेनेला टेंशन! IPL 2023 चालू असतानाच जोफ्रा आर्चर गेलेला बेल्जियमला, कारण घ्या जाणून

दरम्यान मंगळवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास गुजरात टायटन्सने दिलेल्या 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 20 षटकात 9 बाद 152 धावाच करता आल्या. मुंबईकडून नेहल वढेराने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. याशिवाय कॅमेरॉन ग्रीनने 33 धावा केल्या. पण अन्य कोणाला फार काही विशेष करता आले नाही.

गुजरातच्या गोलंदाजांनीही शानदार कामगिरी बजावली. गुजरातकडून नूर अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच राशीद खान आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कर्णधार हार्दिक पंड्याने 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी गुजरातकडून शुभमन गिलने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच डेव्हिड मिलर (46) आणि अभिनव मनोहर (42) यांनीही चांगली खेळी केली. याशिवाय अखेरीस राहुल तेवतियानेही आक्रमक फलंदाजी करताना 3 षटाकारांसह 5 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. त्यामुळे गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 207 धावा केल्या होत्या. मुंबईकडून पीयुष चावलाने 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com