Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

CSK संघात रवींद्र जडेजा राहणार! आयपीएल 2023 साठी या संघाची मोठी ऑफर नाकारली

IPL 2023 Ravindra Jadeja CSK: आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे.

दैनिक गोमन्तक

IPL 2023 Ravindra Jadeja CSK: आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये खेळून पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या वर्षी डिसेंबरमध्ये IPL 2023 साठी इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलाव आयोजित करण्याची योजना आखत आहे, ज्याची तारीख 16 डिसेंबर असण्याची शक्यता आहे. आयपीएल 2022 चेन्नई सुपर किंग्जसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हते. चेन्नईला प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही. आता CSK चा स्टार फलंदाज रवींद्र जडेजाबद्दल मोठी बातमी आली आहे.

जडेजा सीएसकेमध्येच राहणार

Cricbuzz च्या अहवालानुसार, दिल्ली कॅपिटल्ससह अनेक संघांनी रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) ऑफर दिली होती. मात्र, CSK व्यवस्थापनाने याचा इन्कार केला आहे. जडेजा अजूनही जगातील नंबर-1 अष्टपैलू खेळाडू आहे. याचा अर्थ जडेजा चेन्नई संघात कायम राहणार असल्याचे CSK ने सांगितले. दुसरीकडे, शुभमन गिलही गुजरात टायटन्सपासून (Gujarat Titans) वेगळे झाल्याच्या बातम्या येत होत्या. फ्रँचायझीने ते नाकारले आहे.

सीएसकेने अनेक सामने जिंकले

गेल्या मोसमात रवींद्र जडेजा भलेही त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला नसेल, परंतु त्याने चेन्नई सुपर किंग्जला स्वबळावर अनेक सामने जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रवींद्र जडेजा किलर बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये पारंगत आहे. त्याने आयपीएलच्या (IPL) 210 सामन्यांमध्ये1910 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 132 विकेट्स घेतल्या आहेत.

डिसेंबरमध्ये लिलाव

डिसेंबरमध्ये होणाऱ्या लिलावासाठी सर्व संघांची वेतन पर्स 95 कोटी रुपये असेल, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 कोटींनी अधिक आहे, त्यामुळे संघांना खेळाडू खरेदी करणे सोपे होणार आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, राहुल तेओतिया आणि साई किशोर यांना ट्रेडिंगची ऑफर मिळाली आहे, मात्र गुजरात टायटन्सने ही ऑफर नाकारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Leopard Cub Rescued: आधी वाटले कुत्र्याचे पिल्लू, नंतर निघाला बिबट्याचा बछडा; खांडेपार येथील घटना, Watch Video

Chorao Ro Ro Ferry Pass: चोडणवासीयांना 'रो-रो फेरी' महागली! प्रतिट्रीप 5 रुपयांची वाढ; पास होणार वितरित

Chimbel Viral Video: चिंबल येथील पंचसदस्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ! CM सावंतांचे वेधले लक्ष; ग्रामसभेत होणार चर्चा

Goa Live News: गोंयात कोळसो नाका!

Goa ZP Election: कुर्टीमुळे फोंड्यात नवी समीकरणे! हरमलमध्‍ये आणले सौभाग्‍यवतींना पुढे; जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी

SCROLL FOR NEXT