Ravi Shastri | Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

Viral Video: टॉसवेळी रवी शास्त्रींकडून झाली गडबड, हार्दिकची 'या' महिला टीमचा कॅप्टन म्हणून सांगितली ओळख

IPL 2023: गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याच्या नाणेफेकीवेळी रवी शास्त्रींकडून एक चूक झाली.

Pranali Kodre

Gujarat Titans vs Chennai Super Kings: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याने शुक्रवारी सुरुवात झाली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडला. या सामन्यात गुजरातने 5 विकेट्सने विजय देखील मिळवला. पण या सामन्यापूर्वी एक गमतीशीर घटना घडली.

झाले असे की आयपीएल 2023 स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यानंतर पहिल्या सामन्यासाठी नाणेफेक झाली. यावेळी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्यासह मैदानात उपस्थित होते. तसेच समालोचक रवी शास्त्रीही होते. रवी शास्त्री यांनी सर्वांची ओळख करून दिली. पण ओळख करून देताना रवी शास्त्री यांच्याकडून एक चूक झाली.

रवी शास्त्री यांनी हार्दिकची ओळख करून देताना चुकून म्हटले की गुजरात जायंट्सचा कर्णधार. गडबडीत शास्त्रींना लक्षात आले नाही, पण ही चूक कदाचीत हार्दिकच्या लक्षात आली आणि तो यावर हसला देखील.

खरंतर गुजरात जायंट्स हा वूमन्स प्रीमियर लीगमधील संघ आहे. तर हार्दिक कर्णधार असलेल्या आयपीएलमधील संघाचे नाव गुजरात टायटन्स आहे. या दोन्ही संघांचे मालकी हक्कही दोन वेगवेगळ्या कंपन्यांकडे आहे.

गुजरात टायटन्सचे मालकी हक्क सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सकडे आहेत. तसेच गुजरात जायंट्सचे मालकी हक्क अदानी ग्रुपकडे आहे.

गुजरातने जिंकला सामना

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 178 धावा केल्या होत्या. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने दमदार कामगिरी करताना 50 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 9 षटकार मारले.

तसेच मोईन अलीने 23 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. गुजरातकडून राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

तसेच 179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. त्याने 36 चेंडूत ही खेळी करताना 6 चौकार आणि 3 षटकार मारले. तसेच वृद्धिमान साहा (25), साई सुदर्शन(22) आणि विजय शंकर (27) यांनाही छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या.

अखेरीस राहुल तेवातिया (15*) आणि राशिद खानने (10*) आक्रमक खेळत अखेरच्या षटकात गुजरातला 182 धावांपर्यंत पोहचवत विजय मिळवू दिला. चेन्नईकडून राजवर्धन हंगारगेकरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT