RCB Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: बेंगलोरने मारलं पंजाबचं मैदान! प्रभसिमरन - जितेशची झुंज गेली वाया

आयपीएल 2023 स्पर्धेत गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंजाब किंग्सवर एकतर्फी विजय मिळवला आहे.

Pranali Kodre

Punjab Kings vs Royal Challengers Bangalore: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 27 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने 24 धावांनी विजय मिळवला आहे. हा बेंगलोरचा सहा सामन्यांतील तिसरा विजय आहे.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 175 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 18.2 षटकात 150 धावांवर सर्वबाद झाला.

या सामन्यात पंजाबकडून अथर्व तायडे आणि प्रभसिमरन सिंग यांनी डावाची सुरुवात केली होती पण मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात तायडेला 4 धावांवर पायचीत पकडले. त्यानंतर मॅथ्यु शॉर्टला वनिंदू हसरंगाने 8 धावांवर त्रिफळाचीत केले, तर सिराचने चौथ्या षटकात धोकादायक लियाम लिव्हिंगस्टोनला 2 धावांवर पायचीत केले. त्यामुळे पंजाबचा संघ संकटात सापडला होता.

त्यातच सहाव्या षटकात एकेरी धाव घेण्याच्या गोंधळात हरप्रित सिंग भाटियाला मोहम्मद सिराजने डायरेक्ट थ्रो करत धावबाद केले. त्यानंतर कर्णधार सॅम करनने प्रभसिमरनला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तो देखील 10 धावांवर असताना 10 व्या षटकात वनिंदू हसरंगाकडून धावबाद झाला.

12 व्या षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेल्या प्रभसिमरन सिंगला वेन पार्नेलने बाद केले. प्रभसिमरनने 30 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. शाहरुख खानही 7 धावांवर बाद झाला. पण नंतर हरप्रीत ब्रार आणि जितेश शर्मा यांनी डाव सांभाळताना पंजाबला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.

जितेशने एका बाजूने आक्रमक खेळताना दुसऱ्या बाजूने त्याला हरप्रीतने साथ दिली होती. पण 18 व्या षटकात मोहम्मद सिराजने पंजाबला दुहेरी धक्का देत हरप्रीतला 13 धावांवर बाद केले आणि नंतर नॅथन एलिसलाही 1 धावेवर बाद केले. अखेर जितेशची झुंज 19 व्या षटकात हर्षल पटेलने संपवली. याबरोबरच पंजाबचा डावही संपुष्टात आला. जितेशने 27 चेंडूत 41 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले.

बेंगलोरकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच वनिंदू हसरंगाने 2 विकेट्स घेतल्या, तसेच वेन पार्नेल आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरकडून फाफ डू प्लेसिस आणि प्रभारी कर्णधार विराट कोहली यांनी दमदार सुरुवात केली होती. त्यांनी वैयक्तिक अर्धशतके करताना सलामीला 137 धावांची भागीदारी केली. 

त्यांची भागीदारी 17 व्या षटकात हरप्रीत ब्रारने विराटला बाद करत तोडली. विराटने 47 चेंडूत 59 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारले. हरप्रीतने विराटला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला शुन्यावर माघारी धाडले.

त्यानंतरही दिनेश कार्तिकही 7 धावांवर बाद झाला. त्यापूर्वी डू प्लेसिसला नॅथन एलिसने बाद केले. डू प्लेसिसने 56 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 84 धावांची खेळी केली. अखेरीस महिपाल लोमरोर 7 धावांवर आणि शाहबाज अहमद 5 धावांवर नाबाद राहिले. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 174 धावा केल्या.

पंजाबकडून हरप्रीत ब्रारने 2 विकेट्स घेतल्या. तसेच एलिस आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरझाईचा धमाका; सर्वात जलद 'अर्धशतक' ठोकून मोडला मोठा रेकॉर्ड! VIDEO

Viral Video: ना ढोल-ताशा, ना मंडप… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच पठ्ठ्यानं केलं लग्न, व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक; म्हणाले, 'हा पक्का सरकारी नोकरीवाला असणार'

Goa Photo Contest: गोव्यातील नदी, डोंगर, निसर्गसौंदर्याचा फोटो काढा आणि 20 हजार रुपये जिंका; कसा घ्यायचा सहभाग, वाचा सविस्तर

Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

Balendra Shah: रॅपर ते लोकप्रिय राजकारणी... नेपाळच्या तरुणाईचा 'हिरो' आता पंतप्रधानपदाचा दावेदार, काठमांडूचे महापौर बालेन्द्र शाह चर्चेत

SCROLL FOR NEXT