PBKS vs LSG  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: कॅप्टन धवनचे कमबॅक, रबाडाही खेळणार! पाहा पंजाब-लखनऊ संघांची Playing XI

आयपीएल 2023 मध्ये आज पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना होत आहे.

Pranali Kodre

Punjab Kings vs Lucknow Super Giants: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धत शुक्रवारी 38 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात होत आहे. हा सामना पंजाबच्या घरच्या मैदानावर म्हणजे पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून पंजाब किंग्सचा नियमित कर्णधार शिखर धवनने पुनरागमन केले आहे. तो दुखापतीमुळे पंजाबच्या गेल्या तीन सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या जागेवर सॅम करनने पंजाबचे नेतृत्व केले होते.

पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. पंजाब संघात शिखरव्यतिरिक्त कागिसो रबाडाचेही पुनरागमन झाले आहे. तसेच सिकंदर रझाही या सामन्यात खेळताना दिसणार आहे. दरम्यान, लखनऊने त्यांच्या संघात बदल केला नसल्याचे कर्णधार केएल राहुलने सांगितले आहे.

दोन्ही संघांचा हा या हंगामातील प्रत्येकी 8 वा सामना आहे. या सामन्यासाठी पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन आणि कागिसो रबाडा या चार परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच लखनऊने काईल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन आणि नवीन-उल-हक या चार परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

त्यामुळे दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू खेळवले असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूंना वापरता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये लखनऊने कृष्णप्पा गॉथम, डॅनिएल सॅम्स, प्रेरक मंकड, अमित मिश्रा, मार्क वूड यांना संधी दिली आहे. तसेच पंजाबने प्रभसिमरन सिंग, मोहित राठी, ऋषी धवन, मॅथ्यू शॉर्ट आणि हरप्रीत ब्रार या खेळाडूंना राखीव खेळाडूंमध्ये ठेवले आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • लखनऊ सुपर जायंट्स - केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, आवेश खान, यश ठाकूर

  • पंजाब किंग्स - अथर्व तायडे, शिखर धवन (कर्णधार), सिकंदर रझा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चहर, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT