IPL 2023: कोलकाताला तगडा झटका! स्टार परदेशी विकेटकिपर 'या' कारणाने परतला मायदेशी

कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार विकेटकिपर आयपीएल 2023 सुरु असतानाच मायदेशी परतल्याने संघाला झटका बसला आहे.
KKR
KKR Dainik Gomantak
Published on
Updated on

Litton Das return Home: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाची आत्तापर्यंत संमिश्र कामगिरी झाली आहे. आता या आयपीएल हंगामाचा पहिला टप्पा संपला असतानाच कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे.

कोलकाताचा यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास आयपीएल 2023 सोडून मायदेशी म्हणजेच बांगलादेशला परतला आहे. त्याला कौटुंबिक कारणामुळे तातडीने घरी परतावे लागले आहे. दरम्यान, तो परत कधी येणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कोलकाताच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले आहे की 'कुटुंबाच्या मेडिकल इमर्जन्सीमुळे त्याला सकाळी ढाकाला परत जावे लागले आहे. त्याच्या परतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट आलेली नाही.'

KKR
IPL 2023: CSK विरुद्ध रजवाडेच ठरले किंग! RR चा चेन्नईवर 32 धावांनी शानदार विजय

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक रिपोर्ट्सनुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून त्याला आयपीएल खेळण्यासाठी 4 मे पर्यंतच ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यामुळे आता तो उर्वरित आयपीएल 2023 हंगामात खेळण्याची शक्यता कमी आहे.

तो आयपीएल 2023 च्या सुरुवातीलाही बांगलादेश विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामन्यांमुळे मुकला होता. आता तो बांगलादेश संघाबरोबर आयर्लंड दौऱ्यावर जाण्याची शक्यता दाट आहे. कोलकाताने लिटन दासला लिलावात 50 लाख रुपयांना खरेदी केले होते.

लिटनने आयपीएल 2023 मध्ये एकचा सामना खेळला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २० एप्रिल रोजी हा सामना खेळला होता.

KKR
IPL 2023: CSK च्या 'या' धाकडने राजस्थानविरुद्ध केला मोठा पराक्रम, नावावर झाला शानदार रेकॉर्ड!

दरम्यान, यापूर्वी कोलकाता संघाचा भाग असलेल्या बांगलादेशच्या शाकिब अल हसननेही आयपीएल 2023 मधून माघार घेतली होती. तसेच कोलकाताचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर हा देखील त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 हंगामात खेळलेला नाही. त्याच्याऐवजी नितीश राणाच्या नेतृत्वात कोलकाता संघ या हंगामात खेळत आहे.

कोलकाताने आयपीएल 2023 मध्ये आत्तापर्यंत 8 सामने खेळले असून यातील 3 सामने जिंकले आहेत. तसेच 5 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे कोलकाता सध्या गुणतालिकेत हंगामातील 37 सामन्यांनंतर 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत. कोलकाताचा पुढचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध 29 एप्रिल रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com