PBKS vs GT Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: गुजरातमध्ये हार्दिकचं कमबॅक, तर रबाडा, राजपक्षेलाही मिळाली पंजाबकडून संधी, पाहा Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धेत गुरुवारी पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना होत आहे.

Pranali Kodre

Punjab Kings vs Gujarat Titans: गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगमधील १८ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स खेळवला जात आहे. हा सामना पंजाब किंग्सच्या घरच्या मैदानात म्हणजेच मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जात आहे.

या सामन्यातून गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने पुनरागमन केले आहे. तो मागच्या सामन्यात आजारी असल्याने खेळला नव्हता. त्याने या सामन्यात नाणेफेकही जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.

या सामन्यातून गुजरातसाठी मोहित शर्माचे पदार्पण झाले आहे. त्याला यश दयालऐवजी संघात संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विजय शंकरचेही नाव प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही. पण त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरले जाऊ शकते.

तसेच पंजाब संघाने या सामन्यासाठी कागिसो रबाडा आणि भानुका राजपक्षेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. रबाडा काही दिवसांपूर्वीच संघात सामील झाल्याने या सामन्यासाठी उपलब्ध होता. तसेच राजपक्षेही त्याच्या दुखापतीतून सावरला आहे. रबाडाला नॅथन एलिसऐवजी आणि राजपक्षेला सिकंदर रझाऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लियाम लिव्हिंगस्टोनला पंजाबने संघात संधी दिलेली नाही.

पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, सॅम करन आणि कागिसो रबाडा या चार परदेशी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच गुजरातने डेव्हिड मिलर, रशीद खान, अल्झारी जोसेफ आणि जोशुआ लिटिल या चार परदेशी खेळाडूंला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

दरम्यान, पंजाब आणि गुजरात हे दोन्ही संघ आयपीएल २०२३ मधील त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकले होते. मात्र त्यांना आपापल्या तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघ तिसऱ्या विजय मिळवण्याच्या हेतूने आज खेळताना दिसतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • पंजाब किंग्स - प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, ऋषी धवन, अर्शदीप सिंग.

  • गुजरात टायटन - वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT