Hardik Pandya Shikhar Dhawan Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: गुजरात-पंजाब विजयपथावर येण्याच्या निर्धाराने उतरणार मैदानात, अशी असू शकते Playing XI

आयपीएल 2023 च्या 18 व्या सामन्यात गुजरात टायटन्स - पंजाब किंग्स तिसऱ्या विजयासाठी येणार आमने-सामने

दैनिक गोमन्तक डिजिटल

IPL 2023, PBKS Vs GT: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात 18 वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर सुरू होईल.

या सामन्यापूर्वी रिंकू सिंगच्या अखेरच्या षटकातील पाच षटकारांनी गतविजेत्या गुजरात टायटन्सला पराभवाचा धक्का बसला. सनरायझर्स हैदराबादकडून पंजाब किंग्सचा पाय खोलात गेला. पहिल्या दोन्ही लढतींत विजय मिळवल्यानंतर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांना निराशेचा सामना करावा लागला आहे. आता हे दोन्ही संघ विजयपथावर पुन्हा आरूढ होण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात संघाने मागील मोसमात आयपीएलच्या जेतेपदावर मोहोर उमटवली होती. यंदाच्या मोसमात त्यांनी पहिल्या दोन लढतींत विजय संपादन करून थाटात सुरुवात केली; पण हार्दिक आजारी असल्यामुळे तो कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत खेळू शकला नाही.

राशीद खानच्या नेतृत्वात गुजरातने कोलकाता संघाविरुद्धच्या लढतीत ३९ षटकांमध्ये वर्चस्व कायम राखले, पण रिंकू सिंगच्या अखेरच्या षटकातील देदीप्यमान फलंदाजीमुळे त्यांचा पराभव झाला.

आता आजच्या लढतीत हार्दिकचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातसाठी ही आनंदाची बातमी असेल. साई सुदर्शन, विजय शंकर, शुभमन गिल यांनी गुजरातसाठी छान कामगिरी केली आहे. वृद्धीमान साहा, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेतला आहे, पण तरीही

डेव्हिड मिलर व राहुल तेवतिया यांना अधिक षटके फलंदाजी करायला मिळायला हवी. हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीवरही गुजरातच्या संघाचे भवितव्य अवलंबून असेल.

शिखर धवन लढतोय

पंजाब किंग्सला पहिल्या दोन लढतींत विजय मिळवता आला. या लढतीत कर्णधार शिखर धवन याने दमदार फलंदाजी करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 3 लढतींत दोन अर्धशतकांसह 225 धावा फटकावल्या आहेत. पण पंजाबसाठी इतर फलंदाजांना उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. सिमरन सिंग, जितेश शर्मा, भनुका राजपक्षा, शाहरुख खान यांच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत धवनने एकाकी झुंज देत 99 धावांची खेळी केली होती. पण इतरांची साथ त्याला लाभली नाही. त्यामुळे त्याला अन्य फलंदाजांनीही जबाबदारी घेण्याची अपेक्षा असेल. पंजाबसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे लियाम लिव्हिंगस्टोन संघात सामील झाला आहे. त्याच्या येण्याने संघाला अधिक मजबुती मिळण्याची अपेक्षा आहे.

आजच्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन

  • पंजाब किंग्स - प्रभसिमरन सिंग, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, सिकंदर रझा, सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

  • गुजरात टायटन्स - वृद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, राशीद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, जोशुआ लिटिल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT