IPL 2023: जोस बटलरचा मोठा धमाका, नावावर केला 'हा' शानदार रेकॉर्ड!

IPL 2023: राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जोस बटलर एकामागून एक नवनवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे.
Jos Buttler
Jos ButtlerDainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023: राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जोस बटलर एकामागून एक नवनवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. बुधवारी त्याने पुन्हा एकदा तुफानी फलंदाजी केली. CSK विरुद्धच्या सामन्यात बटलरने 36 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकार मारत 52 धावा काढल्या.

यासह त्याने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सर्वात जलद 3000 धावा पूर्ण करणारा बटलर तिसरा खेळाडू ठरला. त्याने आपल्या 85 व्या डावात हा टप्पा गाठला.

ख्रिस गेलच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे

या स्पर्धेत सर्वात जलद 3000 धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ख्रिस गेलच्या नावावर आहे. बटलरने अवघ्या 85 डावात 3000 धावा काढल्या.

दुसरीकडे, केएल राहुल (KL Rahul) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. बटलरने बुधवारी आयपीएलमधील 18 वे अर्धशतकही झळकावले.

17 व्या षटकात रवींद्र जडेजाने त्याला बोल्ड केले. सर्वात जलद 3000 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत बटलरने डेव्हिड वॉर्नर आणि फाफ डू प्लेसिसला मागे टाकले.

Jos Buttler
IPL 2023: जड्डूच्या फिरकीची जादू, संजू सॅमसनला केलं क्लीन बोल्ड; VIDEO

गेल्या वर्षी सर्वाधिक धावा केल्या

बटलर आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, त्याने 863 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीराने या मोसमात चार सामन्यांत तीन अर्धशतके झळकावली आहेत आणि यावेळीही तो ऑरेंज कॅपचा प्रबळ दावेदार आहे.

Jos Buttler
IPL 2023: एमएस धोनीला मागे टाकत रोहीतने केली कमाल, 19व्यांदा जिंकला 'हा' किताब!

IPL मध्ये 3,000 धावा करणारा सर्वात वेगवान फलंदाज

ख्रिस गेल (Chris Gayle) - 75 डाव

केएल राहुल - 80 डाव

जोस बटलर - 85 डाव

डेव्हिड वॉर्नर - 94 डाव

फाफ डू प्लेसिस - 94 डाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com