MS Dhoni | CSK Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni Video: 'तर मी कॅप्टन्सीच सोडणार...' मॅच जिंकल्यानंतरही धोनीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सामना जिंकल्यानंतरही एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना नेतृत्व सोडण्याची वॉर्निंग दिली आहे.

Pranali Kodre

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: सोमवारी (3 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला. सीएसकेने हा सामना आपल्या घरच्या मैदानावर 4 वर्षांनी खेळताना 12 धावांनी जिंकला.

एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने लखनऊला 218 धावांचे लक्ष्य देऊनही हा सामना अखेरपर्यंत अटीतटीचा झाला. दरम्यान, या सामन्यात सीएसकेच्या गोलंदाजांनी 13 वाईड आणि 3 नो बॉल टाकले. यामुळे सीएसकेचा अनुभवी कर्णधार एमएस धोनीही चांगलाच नाराज झाला होता.

सामन्यानंतर तो खेळपट्टी आणि सीएसकेच्या गोलंदाजीबद्दल म्हणाला, 'ही खेळपट्टी अशी आहे ज्यावर तुम्ही धावा करू शकता, पण एकूणच धीम्या गतीची खेळपट्टी आहे. आम्हाला आमच्या पुढील सहा घरच्या सामन्यांदरम्यान ही खेळपट्टी कशी खेळते हे पाहावे लागेल. पण आशा आहे की आम्ही इथे धावा करू. आम्हाला वेगवान गोलंदाजीत सुधारणा कराव्या लागतील आणि परिस्थितीनुसार गोलंदाजी करावी लागेल.'

'जरी खेळपट्टी फ्लॅट असली, तरी फलंदाजांना क्षेत्ररक्षकांच्या हातात चेंडू मारण्यासाठी भाग पाडले पाहिजे. त्यांनी नो बॉल नाही टाकले पाहिजेत आणि कमी वाईड बॉल टाकले पाहिजेत. आम्ही खूप ज्यादाचे चेंडू टाकले. ते कमी केले पाहिजे, नाहीतर त्यांना नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळावे लागेल. ही माझी त्यांना दुसरी वॉर्निंग आहे. त्यानंतर मी बंद करेल.'

सीएकसेकडून दीपक चाहरने 4 षटकात 55 धावा देतानात 5 वाईड चेंडू टाकले होते, तसेच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला आलेल्या तुषार देशपांडेने 4 षटकात 2 विकेट्स घेताना 45 धावा दिल्या. तसेच त्याने 3 नो बॉल आणि 4 वाईड चेंडू टाकले. याशिवाय राजवर्धन हंगारगेकरने 3 वाईड बॉल टाकले. त्याने 2 षटकात 24 धावा दिल्या.

सीएसकेकडून मोईन अलीने सर्वोत्तम गोलंदाजी करताना 4 षटकात 26 धावा देताना 4 विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याने एक वाईड चेंडू टाकला. तसेच मिचेल सँटेनरहीनेही चांगली गोलंदाजी करताना 4 षटकात 21 धावा देत 1 विकेट घेतली. बेन स्टोक्स आणि रविंद्र जडेजा यांनीही प्रत्येकी 1 षटक गोलंदाजी केली, पण त्यांनी अनुक्रमे 18 आणि 14 धावा दिल्या.

दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या सीएसकेकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तसेच डेवॉन कॉनवेने 47 धावांची खेळी केली. त्यांनी सलामीला 110 धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे चेन्नईला 20 षटकात 7 बाद 217 धावांपर्यंत पोहचण्यात मदत झाली.

एकूण हा सामना जिंकल्याने धोनी खूश असल्याचे दिसले. तो म्हणाला, 'हा चांगला सामना होता. मोठ्या धावसंख्येचा सामना होता. आम्ही सर्वच खेळपट्टी कशी असेल, याबद्दल साशंक होतो. एकूणच परिपूर्ण सामना झाला. आम्ही इथे खेळलेल्या 5-6 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पूर्ण स्टेडियम भरले आहे.'

या सामन्यात चेन्नईने दिलेल्या 218 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 षटकात 7 बाद 205 धावा करता आल्या. त्यांच्याकडून काईल मेयर्सने 53 धावांची खेळी केली. तसेच निकोलस पूरनने 32 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही 30 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT