Punjab Kings Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 मध्ये घातक गोलंदाजांनी केला अनोखा रेकॉर्ड, तुम्हीही म्हणाल...

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. रोमांचक सामन्यांमुळे आयपीएल 2023 मध्ये दररोज नवनवीन रेकॉर्ड बनत आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात गोलंदाजांनी मोठा विक्रम केला. त्याबद्दल जाणून घेऊया.

या सामन्यात आश्चर्यकारक घडले

सनरायझर्स हैदराबादकडे भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), उमरान मलिक, मार्को जेसन आणि मयंक मार्कंडेसारखे गोलंदाज आहेत. त्याचबरोबर पंजाब किंग्जकडे हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग आणि सॅम करणसारखे गोलंदाज आहेत.

हा सामना पंजाब किंग्ज आणि सनराजर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी एकूण 74 डॉट बॉल टाकले.

म्हणजेच या सामन्यात एकूण 12.2 षटके मेडन्स टाकण्यात आली. IPL 2023 मध्ये एका सामन्यात सर्वाधिक डॉट बॉल टाकले.

IPL 2023 च्या एका डावात सर्वाधिक डॉट बॉल

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज - 74 डॉट बॉल

दिल्ली कॅपिटल्स वि केकेआर - 67 डॉट बॉल

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स - 65 डॉट बॉल

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स - 61 डॉट बॉल

सनरायझर्स हैदराबादने हा सामना जिंकला

पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार खेळी केली. त्याने शानदार फटकेबाजी केली. त्याने 99 धावांची खेळी खेळली.

त्याच्याशिवाय एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. सॅम करणने 22 धावा केल्या. प्रभसिमरन सिंग, राहुल चहर आणि नॅथन एलिस यांना खातेही उघडता आले नाही.

धवनमुळे हैदराबाद संघाला 144 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, जे सनरायझर्स हैदराबादने 2 गडी गमावून पूर्ण केले. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. त्याचबरोबर मयंक मार्कंडेने सर्वाधिक 4 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT