IPL-2023 च्या प्लेऑफ सामन्यांची तारीख-ठिकाण जाहीर, 'या' शहरांना मिळाले यजमानपद!

IPL 2023 Playoffs: आयपीएल 2023 ची सुरुवात 31 मार्च रोजी झाली आणि त्याचा शेवटचा (अंतिम सामना) 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
IPL
IPL Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023 Playoffs: आयपीएल 2023 ची सुरुवात 31 मार्च रोजी झाली आणि त्याचा शेवटचा (अंतिम सामना) 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

आतापर्यंत आयपीएलचे 28 सामने झाले आहेत आणि प्रत्येक सामना एकापेक्षा जास्त रोमांचक झाला आहे. दरम्यान, बीसीसीआयने प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

बीसीसीआयने प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर केले

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या प्लेऑफ आणि फायनलचे वेळापत्रक जाहीर केले.

चेन्नई आणि अहमदाबाद येथे 23 मे ते 28 मे 2023 दरम्यान प्लेऑफ आणि फायनल खेळले जातील. पहिला क्वालिफायर सामना 23 मे रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार असून त्यानंतर 24 मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे.

दुसरा क्वालिफायर सामना 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल आणि IPL 2023 चा अंतिम सामना देखील त्याच मैदानावर 28 मे रोजी होणार आहे.

IPL
IPL 2023 दरम्यान टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर यशस्वी शस्त्रक्रिया, WTC फायनलमधून...

आतापर्यंत 28 सामने झाले आहेत

IPL 2023 मध्ये 28 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ (8 गुण) गुणतालिकेत अव्वल, तर दिल्ली कॅपिटल्स (2 गुण) तळाशी आहे.

याशिवाय, लखनऊ सुपर जायंट्स संघ 8 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर चेन्नई सुपर किंग्ज 6 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज अनुक्रमे 6 गुणांसह (चारही संघ) चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायझर्स हैदराबाद आठव्या आणि नवव्या क्रमांकावर असून, दोन्ही संघांचे 4-4 गुण आहेत.

IPL
IPL 2023 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वॉर्नरची मोठी झेप, फाफ डुप्लेसिस...!

अहमदाबादमध्ये ग्रँड मॅच होणार आहे

आयपीएल 2022 च्या फायनलप्रमाणेच या सीझनमध्येही या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

या स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. गेल्या मोसमाच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव करुन ट्रॉफीवर कब्जा केला होता. आयपीएल 2023 चा सलामीचा सामनाही याच मैदानावर खेळवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com