Lucknow Super Giants Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: मुंबई इंडियन्सने 'माती' खाल्ली, SKY च्या विकेटने फिरली मॅच; लखनऊ जायंट्सने मारली बाजी

IPL 2023 च्या 63 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 5 धावांनी पराभव केला आहे.

Manish Jadhav

IPL 2023 च्या 63 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 5 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊने 20 षटकांत तीन गडी गमावून 177 धावा केल्या.

प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ 20 षटकांत 5 गडी गमावून 172 धावाच करु शकला. मुंबईकडून ईशान किशनने (Ishan Kishan) सर्वाधिक 59 धावा केल्या. तर लखनऊकडून यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.

दरम्यान, 178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची दमदार सुरुवात झाली. रोहित आणि ईशानने पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली.

रोहित 25 चेंडूत 37 धावा करुन बाद झाला. या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. काही वेळाने ईशान किशनही आऊट झाला. त्याने 39 चेंडूत 58 धावा केल्या.

तर दुसरीकडे, सूर्यकुमार स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 9 चेंडूत 7 धावा केल्या. तर, नेहल वढेरा 20 चेंडूत 16 धावा करुन बाद झाला.

मुंबईला शेवटच्या दोन षटकात 30 धावांची गरज होती. संघाने 19व्या षटकात 19 धावाही केल्या. अखेरच्या षटकात संघाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. मात्र मोहसीन खानने आपल्या षटकात केवळ पाच धावा दिल्या.

दुसरीकडे, मार्कस स्टॉयनिसच्या दमदार 89 धावांच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी बाद 177 धावा केल्या. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने 47 चेंडूत 89 धावा केल्या.

तर मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) जेसन बेहरेनडॉर्फने 2 आणि पियुष चावलाने 1 बळी घेतला. लखनऊने शेवटच्या पाच षटकांत 69 धावा केल्या. नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली.

त्याचबरोबर, पॉवरप्लेमध्येच लखनऊने दोन गडी गमावले होते. जेसन बेहरेनडॉर्फने दीपक हुडा आणि प्रेरक मांकडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

क्विंटन डिकॉकही 7व्या षटकात 16 धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार कृणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस यांनी डाव सांभाळला आणि चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

मात्र, 49 च्या वैयक्तिक स्कोअरवर क्रुणाल रिटायर्ड हर्ट झाला. पण दुसऱ्या टोकाकडून मार्कसने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली.

तसेच, पुरणने 8 धावा केल्या. मार्कस स्टॉयनिसने 47 चेंडूत 89 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. आपल्या खेळीत त्याने 8 षटकार आणि 4 चौकार लगावले. या पराभवानंतर मुंबई 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर लखनऊ या सामन्यानंतर 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT