IPL 2023: हैदराबादविरुद्ध गुजरात संघात मोठे बदल, 'हा' खेळाडू संघाबाहेर, शनकाचे पदार्पण, पाहा Playing XI

सोमवारी आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना खेळवला जात आहे.
GT vs SRH
GT vs SRHDainik Gomantak

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सोमवारी (15 मे) 62 वा सामना खेळवला जात आहे. हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानावर म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार एडेन मार्करमने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

GT vs SRH
IPL 2023: रिंकू-राणाच्या पार्टनरशीपमुळे कोलकाताने मारलं चेन्नईचं मैदान! धोनीच्या CSK ला पराभवाचा धक्का

या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघात ग्लेन फिलिप्स ऐवजी मार्को यान्सिनला संघी देण्यात आली आहे. तसेच गुजरात संघात काही मोठे बदल झाले आहेत. नेटमध्ये सराव करताना विजय शंकरला दुखापत झाल्याने तो या सामन्यातून बाहेर झाला आहे.

तसेच या सामन्यासाठी साई सुदर्शन आणि यश दयाल यांचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय गुजरातकडून श्रीलंकेच्या दसून शनकाचे पदार्पण झाले आहे.

या सामन्यासाठी हैदराबादने कर्णधार मार्करमबरोबरच हेन्रिक क्लासेन, मार्को यान्सिन आणि फझलहक फारुकी या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच गुजरातने डेव्हिड मिलर, दसून शनका राशीद खान आणि नूर अहमद या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.

त्यामुळे दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूला खेळवता येणार आहे.

GT vs SRH
IPL Viral Video: जेव्हा खुद्द गावसकर बनतात कॅप्टनकूलचे फॅन, पळत ऑटोग्राफ घेतानाचा स्पेशल मोमंट कॅमेऱ्यात कैद

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये हैदराबादने अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, अकिल हुसेन, मयंक डागर आणि नितीश रेड्डी यांना संधी दिली आहे. तसेच गुजरातने यश दयाल, श्रीकर भारत, दर्शन नळकांडे, आर साई किशोर आणि शिवम मावी यांना राखीव खेळाडू म्हणून संधी दिली आहे.

या सामन्यात जर गुजरातने विजय मिळवला, तर ते प्लेऑफमध्ये स्थान पक्के करणार आहेत. तसेच हैदराबादचे आव्हान जवळपास संपले आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • सनरायझर्स हैदराबाद - अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल सामद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को यान्सिन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, टी नटराजन

  • गुजरात टायटन्स - शुभमन गिल, वृद्धिमान साहा(यष्टीरक्षक), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, दसुन शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com