Kulwant Khejroliya  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: 'मी गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये काम केले...', कुलवंत खेजरोलियाची संघर्षमय कहाणी

IPL 2023: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Manish Jadhav

IPL 2023: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या खेळाडूचे नाव आहे - कुलवंत खेजरोलिया. 31 वर्षीय कुलवंत 4 वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतला. केकेआरने त्याला ही संधी दिली. अखेर हा गोलंदाज कोण आहे? जाणून घेऊया…

टेबल साफ केले आणि हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले

राजस्थानमधील झुंझुनू येथील खेजरोलियाचे जीवन संघर्षाने भरलेले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने किराणा दुकानात काम केले. हॉटेलमध्ये वेटरचे काम केले, पण त्याचे मन फक्त क्रिकेटमध्येच होते.

खेजरोलियाने एका मुलाखतीत सांगितले होते- 'मी गोव्यातील (Goa) एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होतो, पण मला वाटले की, हेच काम माझ्या नशीबात असेल तर मी पाच वर्षांनंतरही ते करु शकेन. मला क्रिकेट खेळायचे होते. मी माझ्या कुटुंबीयांना सांगितले की, मी रोडवेज विभागात सामील होण्यासाठी अहमदाबादला जात आहे. मी कसे तरी सहा महिने त्यांच्यापासून हे लपवू शकलो.'

संजय भारद्वाज यांची भेट घेतली

यानंतर, मी माझ्या आई-वडिलांना खोटे बोलून दिल्लीला (Delhi) आलो. यादरम्यान मी अशोक विहारमध्ये राहत होतो.

त्यानंतर रुम-मेटच्या मदतीने रोहिणीतील जपानी पार्कमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केल्याची आठवण खेजरोलियाने सांगितली. खेजरोलियाची गोलंदाजी पाहून तिथे खेळणाऱ्या संघाने त्याला नियमित गोलंदाज बनवले.

या संघाकडून त्याला प्रति सामन्यासाठी 500 रुपये देण्यात आले. त्याचवेळी, एका साप्ताहिक सामन्यादरम्यान, तो संजय भारद्वाज यांना भेटला. त्यांनी गौतम गंभीर, उन्मुक्त चंद आणि नितीश राणासारखे खेळाडू तयार केले आहेत.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये हॅट्ट्रिक घेतली

खेजरोलियाने दिल्लीला सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी जिंकण्यास मदत केली होती. तो 10 सामन्यांत 6.56 च्या इकॉनॉमीने 14 बळी घेऊन स्पर्धेतील चौथा सर्वोत्तम गोलंदाज होता.

अंतिम सामन्यात, त्याने 24 धावांत 2 बळी घेतले होते. विजय हजारे ट्रॉफी 2018 च्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये तो सामन्याचा हिरो ठरला होता.

त्याने 31 धावांत 6 बळी घेतले. या सामन्यात त्याने शानदार हॅटट्रिक केली होती. तर त्याच्या संघाचा कर्णधार गौतम गंभीरने शानदार शतक झळकावले.

आरसीबीने 85 लाखांना खरेदी केले

त्याची शानदार कामगिरी पाहून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला 85 लाख रुपयांना खरेदी केले. खेजरोलियाने 2018 मध्ये 3 सामन्यात 2 बळी घेतले होते.

तर 2019 मध्ये 2 सामन्यात 1 बळी घेतला होता. यानंतर त्याला 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने घेतले. त्यानंतर त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली नाही.

गेल्या वर्षी केकेआरने त्याला 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. डाव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने आतापर्यंत 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 32 बळी, 29 लिस्ट ए सामन्यात 61 बळी आणि 18 टी-20 सामन्यात 18 बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या एक वर्षापासून तो क्रिकेट खेळलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT