Harry Brook Dainik Gomantak
क्रीडा

हॅरी ब्रुकनं झळकावलं IPL 2023 मधील पहिलं शतक! विराट-रोहितसारख्या दिग्गजाच्या पंक्तीत सामील

Pranali Kodre

Harry Brook Century: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना होत आहे. ईडन गार्डन्सवर होत असलेल्या या सामन्यात हॅरी ब्रुकने शतकी खेळी केली आहे. तसेच त्याने काही विक्रमांनाही गवसणी घातली आहे.

या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. या आमंत्रणाचा स्विकार करत हैदराबादकडून सलामीला ब्रुकसह मयंक अगरवाल उतरला. पण अगरवालने आंद्र रसेलने गोलंदाजी केलेल्या पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 9 धावांवरच विकेट गमावली. यानंतर राहुल त्रिपाठीही याच षटकात 4 चेंडूत 9 धावा करून बाद झाला.

मात्र, यानंतर ब्रुक आणि कर्णधार एडन मार्करम यांनी हैदराबादचा डाव सांभाळताना 72 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, दोघांचे अर्धशतक पूर्ण झाले. पण अर्धशतकानंतर मार्करम बाद झाला. त्याने 26 चेंडूत 50 धावांची खेळी केली. पण तरी ब्रुकने त्याची लय कामय ठेवली होती. त्याला नंतर अभिषेक शर्मा आणि हेन्रिक क्लासेन यांनीही चांगली साथ दिली.

अखेरच्या षटकात 24 वर्षीय ब्रुकने 55 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. त्याने 12 चौकार आणि 3 षटकारांसह 100 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 4 बाद 228 धावा केल्या.

दिग्गजांच्या यादीत सामील

दरम्यान, ब्रुक आयपीएल 2023 हंगामात शतक करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल शतक झळकावणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी ख्रिस गेल, विराट कोहली, रोहित शर्मा आणि माहेला जयवर्धने यांनी असा पराक्रम केला आहे. या चौघांनीही ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध प्रत्येकी 1 शतक केले आहे.

वयाच्या 24 व्या वर्षी शतक

त्याशिवाय ब्रुक हा आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा चौथ्या क्रमांकाचा परदेशी खेळाडू ठरला आहे. त्याने हे शतक केले, तेव्हा त्याचे वय 24 वर्षे आणि 51 दिवस इतके होते. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक करण्याचा विक्रम क्विंटन डी कॉकने केला होता. त्याने 23 वर्षे 122 दिवस वय असताना पहिले आयपीएल शतक केले होते.

त्यानंतर डेव्हिड वॉर्नरचा क्रमांक लागतो, त्याने 23 वर्षे 153 दिवस इतके वय असताना पहिले शतक केले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड मिलर असून त्याने 23 वर्षे 330 वय असताना पहिले आयपीएल शतक केले होते.

ब्रुकला सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2023 लिलावादरम्यान 13.25 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT