Shardul Thakur Dainik Gomantak
क्रीडा

Shardul Thakur: RCB ला दिसलं 'लॉर्ड' शार्दुलचं 'विराट' रूप! तुफानी फिफ्टीसह रचला मोठा विक्रम

IPL 2023: शार्दुल ठाकूरने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी करताना मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Shardul Thakur Fifty against RCB: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात केकेआरकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने आक्रमक अर्धशतक ठोकत काही विक्रम केले आहेत.

या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. केकेआरकडून रहमानुल्लाह गुरबाजने एक बाजू सांभाळताना अर्धशतकी खेळी केली. मात्र, केकेआरने दुसऱ्या बाजूने महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. त्यामुळे एकाक्षणी केकेआरची अवस्था 89 धावांत 5 विकेट्स अशी झाली होती.

पण त्यानंतर रिंकू सिंगला साथीला घेत शार्दुलने ताबडतोड फटकेबाजी केली. त्याने पाहाता पाहाता 20 चेंडूत अर्धशतक केले. त्यामुळे आयपीएल 2023 मध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या जोस बटलरच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. बटलरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना 20 चेंडूत अर्धशतक केले होते.

तसेच शार्दुलने रिंकू सिंगबरोबर सहाव्या विकेटसाठी अवघ्या 47 चेंडूत 103 धावांची भागीदारी केली. रिंकू 19 व्या षटकाच्या अखेरच्या षटकात 46 धावांवर बाद झाला. त्यानंतर शार्दुलला अखेरच्या षटकात मोहम्मद सिराजने बाद केले. शार्दुलने 29 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 68 धावांची खेळी केली. त्यामुळे केकेआर 20 षटकात 7 बाद 204 धावांपर्यंत पोहचू शकले.

दरम्यान, आयपीएलमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये शार्दुलने दुसऱ्या क्रमांकावरील ड्वेन ब्रावोची बरोबरी केली आहे. ब्रावोने देखील 7 एप्रिल 2018 रोजी चेन्नई सुपर किंग्सकडून 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सविरुद्ध 68 धावांची खेळी केली होती.

या यादीत अव्वल क्रमांकावर आंद्र रसेल आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्सकडून 10 एप्रिल 2018 रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 88 धावांची खेळी केली होती.

रिंकू-शार्दुलची विक्रमी भागीदारी

तसेच आयपीएलमध्ये 6 व्या किंवा त्याखालील विकेटसाठी सर्वोच्च धावांची भागीदारी करणाऱ्या जोड्यांमध्ये शार्दुल आणि रिंकू यांची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर अंबाती रायुडू आणि कायरन पोलार्ड असून त्यांनी मुंबई इंडियन्सकडून विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 2012 मध्ये 122 धावांची भागीदारी केली होती.

तसेच दुसऱ्या क्रमांकावर डेव्हिड हसी आणि वृद्धिमान साहा यांची जोडी असून त्यांनी पंजाब किंग्सकडून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 2008 साली 104 धावांची भागीदारी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'एलआयसी'ची अदानी उद्योग समूहात 34,000 कोटींची गुंतवणूक: सरकारचा दबाव की धोरणात्मक निर्णय? - संपादकीय

Goa Politics : खरी कुजबुज, गोव्याचा भावी मुख्यमंत्री कोण?

Super Cup 2025 : धडाकेबाज एफसी गोवा उपांत्य फेरीत, सुपर कप फुटबॉलमध्ये गतविजेत्यांचा इंटर काशी संघावर 3 गोलने विजय

गोव्यातील सार्वजनिक सेवेतील वाहनांना GPS ट्रॅकिंग आणि पॅनिक बटन बसविण्याची सूचना, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

"सरकारी नोकर भरतीत अन्याय नको", दादा वैद्य चौकात मराठीप्रेमींकडून संताप व्यक्त; धो धो पावसातही मराठीप्रेमींचा निर्धार

SCROLL FOR NEXT