BCCI ची डोकेदुखी वाढली! IPL वर पुन्हा कोरोनाचं संकट, संघांनाही दिला 'हा' इशारा

भारतात सध्या कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढताना दिसत आहेत.
CSK
CSK Dainik Gomantak
Published on
Updated on

BCCI issues Covid-19 advisory: गेल्या तीन वर्षांपासून जगभारातील अनेक देश कोविड-19 आजाराच्या संकटाचा सामना करत आहे. तीन वर्षांपूर्वी या साथीच्या रोगाने संपूर्ण जगच ठप्प पाडले होते. पण अशात आता हळुहळू सर्व पूर्वपदावर येत होते. मात्र, पुन्हा एकदा कोविड-19 चा धोका वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता भारतात सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2012 स्पर्धेलाही सावधगिरीचा इशारा मिळाला आहे.

भारतात गेल्या काही दिवसात कोविड-19 ची प्रकरणे वाढली आहेत. त्यामुळे आयपीएल 2023 साठी सर्व 10 संघांच्या मालकांना, खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोविड-19 पासून वाचण्यासाठी काळजी घेण्यासाठी सांगण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबत निर्देश जारी केले आहेत.

CSK
IPL 2023: राजस्थान रॉयल्स जयपूर ऐवजी गुवाहाटीमध्ये का खेळतायेत 'होम गेम'? जाणून घ्या कारण

बीसीसीआयच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या सर्वांना सतर्क आणि सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार प्रकरणे वाढत आहेत, पण काळजी करण्याचे कारण नाही, कारण आम्ही खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोविडची मार्गदर्शक तत्वे पाळण्यास सांगितले आहे. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. सरकारकडून देण्यात आलेले आदेश आम्ही पाळू. आमची टीम परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.'

दरम्यान काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2023 साठी हिंदी समालोचन करणारा भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला होता. याबद्दल त्यानेच माहिती दिली होती.

CSK
IPL 2023 मुळे न्यूझीलंडचा घोळ! कर्णधाराचंच वर्ल्डकप खेळणं झालं महाकठीण

तसेच यापूर्वीही गेल्या तीन वर्षात आयपीएलला कोविड-19चा फटका बसला आहे. 2020साली संपूर्ण आयपीएल हंगाम युएईला झाला होता. 2021 मध्ये अर्धा हंगाम युएईला हलवण्यात आला होता. तसेच 2022मध्ये महाराष्ट्रातच आयपीएलचे सामने पार पडले होते.

या तीन हंगामानंतर यंदा आयपीएल पूर्वीच्या होम-अवे पद्धतीने खेळवले जात आहे. म्हणजेच प्रत्येक संघ आपापल्या घरच्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात सामने खेळणार आहे. तसेच यंदा स्टेडियमही प्रेक्षकांसाठी पूर्ण क्षमतेने खुली करण्यात आली आहे. पण आता पुन्हा एकदा आयपीएलवर कोविडचे काळे ढग दाटून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com