Kolkata Knight Riders Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: शार्दुलच्या वादळी बॅटिंगनंतर KKRनं विणलं फिरकीचं जाळं! RCB चा दारूण पराभव

Pranali Kodre

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. गुरुवारी झालेल्या या सामन्यात केकेआरने 81 धावांनी विजय मिळवला. हा केकेआरचा या हंगामातील पहिला विजय ठरला.

ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात केकेआरने आरसीबीसमोर 205 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला 17.4 षटकात सर्वबाद 123 धावाच करता आल्या. केकेआरकडून गोलंदाजीत फिरकी गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका निभावली.

या सामन्यात आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवात चांगली केली होती. त्यांनी जवळपास 10 च्या रनरेटने धावाही करण्यास सुरुवात केली होती. पण त्यांची 44 धावांची भागीदारी पाचव्या षटकात सुनील नारायणने तोडली. त्याने विराटला 21 धावांवर बाद केले.

त्याच्या पुढच्याच षटकात वरूण चक्रवर्तीने फाफ डू प्लेसिसला 23 धावांवर बाद केले. यानंतर मात्र, आरसीबीची फलंदाजी कोलमडली. नारायण आणि चक्रवर्तीने सुरुवातीला धक्के दिल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला उतरलेल्या 19 वर्षीय फिरकीपटू सुयश शर्मानेही पदार्पणात प्रभावी कामगिरी करताना दिनेश कार्तिक (9), अनुज रावत (1) आणि कर्ण शर्मा (1) यांच्या विकेट्स घेतल्या.

आरसीबीकडून मायकल ब्रेसवेल (19) आणि ग्लेन मॅक्सवेललाही (5) फार काही खास करता आले नाही. त्यामुळे अखेर आरसीबीचा डाव या सामन्यात 18 षटकांच्या आतच संपला. दरम्यान आरसीबीकडून डेव्हिड विली २० धावांवर नाबाद राहिला. आरसीबीच्या 10 विकेट्सपैकी 9 विकेट्स वरूण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि सुयश शर्मा या फिरकीपटूंच्य त्रिकुटाने घेतल्या.

वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच सुयश शर्माने 3 विकेट्स घेतल्या. अनुभवी सुनील नारायणने 2 विकेट्स घेतल्या आणि शार्दुल ठाकूरने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, आरसीबीने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातही चांगली केली होती. चौथ्या षटकात डेव्हिड विलीने वेंकटेश अय्यर आणि मनदीप सिंगला लागोपाठच्या चेंडूवर बाद केले होते. तसेच कर्णधार नितीश राणाही 1 धावा करून मायकल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला होता.

पण एकबाजू सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने सांभाळताना अर्धशतक केले. पण त्याला 12 व्या षटकात कर्ण शर्माने 57 धावांवर बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर कर्णने धोकादायक आंद्र रसेललाही तंबुचा रस्ता दाखवला होता.

मात्र, यानंतर रिंकू सिंगच्या साथीत शार्दुल ठाकूरने आरसीबीच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने 20 चेंडूतच शतक ठोकत या आयपीएल हंगामातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्यांनी केवळ 47 चेंडूत 6 व्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी करत केकेआरला १९० धावांच्या पार पोहोचवले होते. पण 19 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रिंकू 2 चौकार आणि 3 षटकारांसह 46 धावा करून बाद झाला.

अखेरच्या षटकात शार्दुलही बाद झाला. शार्दुलने 29 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 68 धावा केल्या. अखेरचे दोन चेंडू खेळताना उमेश यादवने एका चौकारासह नाबाद 6 धावा करत केकेआरला 20 षटकात 7 बाद 204 धावांपर्यंत पोहचवले. महत्त्वाचे म्हणजे केकेआरकडून केवळ गुरबाज, रिंकू आणि शार्दुल यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.

आरसीबीकडून कर्ण शर्मा आणि डेव्हिड विली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, मायकल ब्रेसवेल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT