MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: 'माझा शेवटचा...', कॅप्टनकूलने दिले रिटायमेंटचे संकेत, पाहा नक्की काय म्हणाला धोनी

Pranali Kodre

MS Dhoni hints about Retirement: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना पार पडला. या सामन्यात सीएसकेने 7 विकेट्सने सहज विजय मिळवला. पण हा सामना झाल्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने बोलताना त्याच्या निवृत्तीबद्दल संकेत दिले आहेत.

धोनीने सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये हर्षा भोगले यांच्याशी बोलताना सामन्यातील विविध गोष्टींवर भाष्य केले. तसेच त्याने हे देखील सांगितले की हा त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा टप्पाही आहे.

धोनी म्हणाला, 'जे काही असेल, हा माझ्या कारकिर्दीतील अखेरचा टप्पा आहे. त्यामुळे त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. इथे छान वाटत आहेत. त्यांनी (चाहत्यांनी) खूप प्रेम आणि आपलेपणा दिला आहे. ते मला ऐकण्यासाठी उशीरापर्यंत थांबतात. मला फलंदाजीसाठी फार संधी मिळत नाही. पण याबद्दल काहीही तक्रार नाही.' याशिवाय धोनीने मथिशा पाथिराना तसेच अन्य गोलंदाजांचेही कौतुक केले आहे.

खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून धोनीचा आयपीएल 2023 हा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा सुरू आहे. अनेकांनी याबद्दल अंदाजही व्यक्त केले आहेत. त्यातच धोनीने हा त्याच्या कारकिर्दीचा अखेरचा टप्पा असल्याचे सांगून या चर्चांना दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता अनेकांकडून धोनी खरंच हा अखेरचा आयपीएल हंगाम खेळत असावा, या शक्यता व्यक्त केली जात आहे.

धोनीने गेल्या 16 हंगामात आयपीएल खेळले आहे. तसेच सीएसकेने खेळलेल्या प्रत्येक हंगामात त्याने नेतृत्वही केले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याने त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेला 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे. धोनी आयपीएलमध्ये 200 पेक्षा अधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करणाराही एकमेव खेळाडू आहे.

सीएसकेचा विजय

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 134 धावा केल्या होत्या. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त कोणालाही 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. सीएसकेकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तसेच 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग सीएसकेने 18.4 षटकात 3 विकेट्स गमावत 138 धावा करत सहज पूर्ण केला. सीएसकेकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 77 धावांची नाबाद खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाडने 35 धावांची खेळी केली. हैदराबाजकडून मयंक मार्केंडेने 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT