Moeen Ali on MS Dhoni: भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू मोईन अली एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खेळताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याची चर्चा आहे. आता याबद्दल मोईन अलीने प्रतिक्रिया दिली आहे.
मोईन अलीने म्हटले आहे की धोनी कदाचीत पुढचा आयपीएल हंगामही खेळू शकतो. धोनी आयपीएल 2023 हंगामात खेळताना चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात 17 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 32 धावाही केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे सीएसके विजयाच्या जवळ गेले होते. मात्र सीएसकेला केवळ 3 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार मोईन याने म्हटले आहे की 'धोनी नक्कीच पुढच्यावर्षी खेळू शकतो. तो ज्याप्रकारे खेळत आहे, मला वाटत नाही की त्याची फलंदाजी त्याला खेळण्यापासून थांबवू शकते, अगदी पुढच्या दोन, तीन वर्षे तरी.'
तो पुढे म्हणाला, 'तो राजस्थानविरुद्ध ज्याप्रकारे खेळला, त्याचे मला आश्चर्य वाटले नाही. मी त्याला नेट्समध्ये गोलंदाजी करताना पाहात आहे आणि तो अविश्वसनीय फलंदाजी करत आहे. या वयातही त्याला पाहून चांगले वाटते. तुम्ही जेव्हा फलंदाजीला इतक्या उशीरा येता, तेव्हा सर्व सोपे नसते. पण लोक त्या गोष्टी बऱ्याचदा विसरतात. पण कदाचीत तेच त्याला या भूमिकेसाठी सर्वोत्तम ठरवते.'
याशिवाय मोईनने धोनी आणि इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गन यांची तुलनाही केली आहे. मोईन म्हणाला, 'ते दोघेही बरेचसे सारखे आहेत. दोघेही खूप स्पष्ट आणि शांत आहेत. पण तरीही खूप वेगळेही आहे. त्यांच्या आवडीनिवडी आणि बाकी गोष्टी खूप वेगळ्या आहेत.'
'त्यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे धोनी त्याचे नेतृत्व बरेचसे त्याचे मन त्यादिवशी जसे कौल देते, त्यानुसार करतो. हे मॉर्गनबरोबरही होते, पण त्याचबरोबर तो आकडेवारीवरही बराच विश्वास ठेवतो. पण ते दोघेही खूप शांत आहेत. पण शिष्टाचाराच्याबाबत मात्र ते खूप सारखे आहेत.'
'मी धोनीचे सर्वोत्तम वर्णन असे करू शकतो की तो खूप सामान्य व्यक्तीसारखा आहे. त्याला खूप फॅन फॉलोविंग आहे, पण त्याचा त्याला फार अभिमान नाही किंवा तो तसे वागत नाही. तो खूप नम्र आहे. त्याच्याशी तुम्ही काहीही बोलू शकता. तो जसा टीव्हीवर दिसतो, तसाच तो आहे.'
याशिवाय मोईन अलीने असेही सांगितले की तो आयपीएलमध्ये त्याच्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करत असून यावर्षी भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठीही तयारी करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.