IPL  Dainik Gomantak
क्रीडा

IPL मध्ये 'या' 3 दिग्गजांना एकदाही षटकार मारता आला नाही, नावं जाणून तुम्हीही म्हणाल...

IPL Records: आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत T20 क्रिकेट लीग आहे, ज्यामध्ये दिग्गज खेळाडूंसह नवखे खेळाडूही खेळतात.

Manish Jadhav

IPL Records: आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत T20 क्रिकेट लीग आहे, ज्यामध्ये दिग्गज खेळाडूंसह नवखे खेळाडूही खेळतात.

मात्र, आयपीएलमध्ये असे 3 खेळाडू आहेत, ज्यांना या टी-20 क्रिकेट लीगमध्ये आजपर्यंत एकही षटकार मारता आलेला नाही, असे कोणी म्हटले तर त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. मात्र, आयपीएलमधील कोणते 3 स्टार क्रिकेटर्स आहेत, ज्यांना एकही षटकार मारता आला नाही ते पाहूया...

1. मायकेल क्लार्क

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला आयपीएलमध्ये एकही षटकार मारता आलेला नाही. मायकेल क्लार्कने ऑस्ट्रेलियाकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळले आहे.

क्लार्कने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 53 षटकार आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 षटकार आणि कसोटी क्रिकेटमध्ये 39 षटकार मारले आहेत, परंतु आयपीएलमध्ये (IPL) त्याला एकही षटकार मारता आलेला नाही.

2. आकाश चोप्रा

भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राला आयपीएलमध्ये एकही षटकार मारता आलेला नाही. आयपीएल व्यतिरिक्त आकाश चोप्राला भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही षटकार मारता आलेला नाही.

भारताचा (India) माजी सलामीवीर आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने भारतासाठी 10 कसोटी सामने खेळले आहेत.

याशिवाय, आकाशने 7 आयपीएल सामनेही खेळले आहेत, मात्र या फलंदाजाच्या नावावर एकही षटकार नाही.

आकाश चोप्रा हा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगला फलंदाज राहिला आहे. आकाशने 162 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 45.35 च्या सरासरीने 10,839 धावा केल्या आहेत.

3. शोएब मलिक

पाकिस्तानचा महान फलंदाज शोएब मलिक हा टी-20 फॉरमॅटचा मास्टर मानला जातो. शोएब मलिकने 510 टी-20 सामन्यांमध्ये 12,528 धावा केल्या आहेत, परंतु आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एकही षटकार नाही. शोएब मलिकने आयपीएलमध्ये 7 सामने खेळले आहेत, परंतु या टी-20 क्रिकेट लीगमध्ये त्याने एकही षटकार मारलेला नाही. शोएब मलिकने टी-20 क्रिकेटमध्ये 166 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT