RCB Dainik Gomantak
क्रीडा

Viral Photo: RCB संघाने IPL चे विजेतेपद जिंकले तर कसे असेल सेलिब्रेशन? पाहा AI ची खास झलक

विराट कोहली आणि इतर सहकारी ट्रॉफी जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करताना कसे दिसत आहेत हे फोटोपाहुन कळू शकते.

Puja Bonkile

Viral Photo: IPL 2023 च्या 65 व्या सामन्यात गुरुवारी (18 मे) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने पराभव केला. तसेच आता आरसीबी संघ शेवटच्या सामन्यात चौथ्या स्थानावर पोहोचला आहे आणि प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. 

दरम्यान, आरसीबीचे काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे फोटो AI च्या मदतीने बनवण्यात आली आहेत, ज्यामध्ये RCB यावेळी IPL चे जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरले तर सेलिब्रेशन कसे असेल हे दाखवण्यात आले आहे.  आरसीबीच्या चाहत्यांना हे फोटो सोशल मीडियावर खूप आवडले आहे.

ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहली आणि इतर सहकारी कसे सेलिब्रेशन करताना दिसत आहेत, हे फोटोमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर हे फोटो (Photo) पाहून लोकही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी आरसीबी शानदार खेळ करत आहे. यामुळे तो या मोसमात प्ले-ऑफमध्ये जाण्याची शक्यता आहे. मात्र, इतर संघांच्या विजय-पराजयावरही ते अवलंबून असेल.

आरसीबीचे हे फोटो शाहिद नावाच्या युजरने शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करत त्याने लिहिले, 'यावेळी आरसीबी टीमने ट्रॉफी जिंकली तर सेलिब्रेशन कसे असेल?' यावर एका यूजरने लिहिले की, 'हा विजय फक्त एक काल्पनिक गोष्ट आहे.' दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'हे फक्त AI च्या मदतीने शक्य आहे.' त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, 'हे स्वप्न कधी पूर्ण होईल माहीत नाही.' आयपीएलच्या इतिहासात RCB संघाला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

SCROLL FOR NEXT